सरपंच कोणाला पण करा पण हे एकदा वाचा
लक्ष्य ग्रामपंचायत
सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्या,सदस्य,पँनल प्रमुख कसा असावा,कसा नसावा.
गावामधील
लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजनारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती
मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा.
गावचा होणारा
सरपंच गावात रहाणारा असावा,जेव्हा गावाला
अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा.
जर गावामध्ये
भीषण दुष्काळ पडलेला असताना शासन कडून दोन टँकर असताना गावात एकच टँकर कधी तरी
टाकणारा वरून उपकाराची भाषा करणारा नसावा कारण ते त्याचे कर्तव्य आहे.
गावाच्या विकासासाठी आलेला 14 वा वित्त आयोग निधी सर्व मिळून म्हणजे सरपंच,ग्रामसेवक,आणि स्वयंघोषित लोकल नेते,आदी जन वाटून खाणारे नसावे पुन्हा गाववाल्यांना माहीत
झाल्यावर आम्ही पैसे देतो म्हणून पुन्हा पैसे बुडावणारे लबाड नसावा.
शासनाचे स्कीम
लाभार्थींना फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारे नसावा उदा,घरकुलासाठी पाच दहा हजार रुपये घेऊन पार्टी
करणारा नसावा.
MRGS मधून मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थीकडून दहा पंधरा
हजार घेणारा नसावा.
सरपंच कोणाला पण करा पण हे एकदा वाचा
दारिद्रय रेषेत नाव घालण्यासाठी दोन हजार रुपये घेणारा
नसावा.
ग्रामपंचायत
सदस्य सदस्या आपल्या वार्ड तील समस्याची जाणीव असणारा असावा आणि पोटतिडकीने कामे
करणारा असावा.
गावातील गरीबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत
करणारा असावा.
लोकांना खोटी
आश्वासने देऊन लोकांना नोकरी लावतो.अडचणीच्या काळात पैसे देऊन व्याज उकळणारा आदी
मार्गाने लुबाडणूक करून लोकांची दिशाभूल करणारा नसावा.
गावात मंजूर
झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करून पूर्ण बिल उचलणारा आणि शाळेतील
मुख्याध्यापला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा.
सर्वात महत्वाचे
म्हणजे गावासमोर आमचे भांडण आहे असे दाखवून गावासाठी आलेले पैसे वाटून खाणारा
नसावा.
गावातील सर्व पदे
आपल्याच घरात ठेवणारा तर नकोच उदा भावाला एक पद,बायकोला एक पद,चुलत भावाला एक पद,स्वतःला अनेक पदे,आणि सब माल अंदर सगळं मलाच पहिजे अशी भावना
असणारा नसावा.
गावातील सर्व
लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा.
सरपंच आणि
प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर
त्याच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा
असावा.
गावातील घनकचरा गटारी रस्ते यांचे नियोजन करून स्वच्छ
ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा.
कायम वर वर गोड
गोड गप्पा
मारून हात हलुन
फसवनारा तर अजिबात नसावा.
सरपंच कोणाला पण करा पण हे एकदा वाचा
जवळच्या
व्यक्तीची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा.
सरपंच झाल्यावर
फक्त आपल्याच पँनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पँनलच्या लोकांची कामे
करायची नाही असा सरपंच नसावा.
सरपंच झाल्यावर
कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारा
असावा.
पँनल प्रमुख
गावात राहणारा असावा गावातील कोणत्याही संस्थाच्या निवडणूका आल्यावर गावात येणार
नसावा आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकांच्या पाय पडणारा नसावा.
ग्रामस्थांनो जर का वरील गुण
तुमच्या सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सदस्या,पँनल प्रमुख
यांच्यात दिसले नाहीत तर तुमच्या गावाच्या विकासाला खिळ बसलीच समजा.
0 comments:
Post a Comment