वाढदिवसाच्या दिवशीच काळाने केला घात.
मृतक सागर ला दिला मदतीचा हात - दादा ठाकुर, अक्षय चोखंडे. टायगर ग्रुप.
वाढदिवसाच्या दिवशीच काळाने केला घात.
सागर परघरमोर रा. मोखा जानोरी येथे राहणारा तरुण शेगावरून स्वतःच्या वाढदिवसानिमित्त संध्याकाळी 7:30 वाजता केक घेऊन घरी जात होता. जाता जाता शेगाव ते कालखेड रस्त्यामध्ये त्याचा अपघात झाला. अपघातात तो अर्धातास तडफडत होता त्याला कोणीच मदत केली नाही शेवटी तो जाग्यावरच मरण पावला. त्यानंतर पण तो 1 तास त्याच ठिकाणी मृतावस्थेत पडलेला होता. टायगर ग्रुपला माहिती होताच ग्रुप सदस्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मृतदेह सईबाई मोटे रुग्णालय शेगाव येथे आणले. त्याच्या जवळील आधारकार्ड पाहून मोखा जानोरी येथील सागर परघरमोर असल्याचे समजताच मोखा येथे मित्राला फोन करून त्याच्या नातेवाईकांना कळवले. नातेवाईक आल्यावर त्या मृतकाजवळील पाकीट, मोबाईल, पैसे आदी वस्तू त्यांच्या ताब्यात दिल्या. ह्यावेळी दादा ठाकुर, अक्षय चोखडे, लोकेश तायडे व टायगर गुप मित्र परीवाराचे सदस्य ह्यांनी मदतीचा हात दिला.
0 comments:
Post a Comment