परप्रांतिय तरुण आणि महाराष्ट्रीयन तरुण.
![]() |
महाराष्ट्रीयन तरुण |
विचार करण्यासारखा प्रश्न?
महाराष्ट्रात आता
पर्यंत बेरोजगारी होती.
तर परप्रांतिय
एवढे कुठे कामं करत होते ?
महाराष्ट्रातून
कामगारांच्या रेल्वे गेल्या,
महाराष्ट्रात एक कामगारांची रेल्वे आलीं नाही.
सदरचा मेसेज
वॉटस्अपवर फिरत होता..
वाचुन खरच विचार
आला.. की हे खर आहे..
पण.........
एक सत्य हे ही आहे..
परप्रांतीयांच्या
बरो बरी सोडा..
५०% कामही
महाराष्ट्रीयन मुल करत नाहीत.
१०% मेहनती
आहेत..
बाकीचे पुढार्यांच्या
सतरंज्या ऊचलत.. भाऊ दादा करत फिरणयात धन्यता मानतात..
काही रोमीयो
आईच्या मेहरबानीने दोनवेळच गीळतात..
कष्टकरी कमी
आहेत..
गॉगल.. स्मार्ट
फोन.. अंगावर खोटे दागिने.. भाईचा .. आवाज करत.. मागुन पुढून.. बोंबलत फिरणार पण
घामाच दाम कमवायचा विचार नाही करणार..
बापाची पारंपरिक
शेती..व्यवसाय नाही सांभाळणार..
कटू पण सत्य आहे..
परप्रांतीय
गेले.. येतिल न येतिल.. महाराष्ट्रातील तरूणांना संधी आहे..
ते परतायची वाट
पाहू नका..
पण रिकाम्या जागा
भरण्यासाठी पुढे न येता.. मेहनत.. तांत्रिक शिक्षण.. स्वयंरोजगार.. व्यवसाय यासाठी
त्यांच्या सारखे कष्ट करण्याची तयारी ठेवा..
स्मार्ट फोन असुद्या..
जगाशी संपर्क आणि ज्ञानाचा सागर आहे तो.. फक्त
भाईचा बड्डे..आणि मित्र मैत्रिणी बरोबर गप्पा करायला वापरु नका..
स्वतः कडक होऊन
फिरा..
पण त्याचवेळी
बापाच्या फाटक्या धोतराची लाज ठेवा..
चकणा आणि बाटली
रिकामी झाली की सकाळी बनीयनची आणि अंतरवस्त्रावरची भोक मोजा.. आईच्या पातळाची थिगळ
मोजा..
आणि तरीही आपण
काय करायचं हे नाहीच कळाल तर रोजगाराच्या
राजकीय गप्पा बंद करून .. आत्मपरीक्षण करा..
माझे वडील म्हणायचे लबाडीची.. शिंदळकीची ( चारीत्र्य ) लाज धरावी..कष्टाची काय लाज..??
पण आजच्या पिढीला
नेमक उलट करायला आवडत अस म्हणाव लागतय..
सरसकट नसतिलही पण
अधिक प्रमाणात..
हे खेड असो की
शहर १५ ते ३५ वयोगटातील ८०% तरुण आज मोबाईल.. मावा.. मदीरा.. यातच अडकलीयेत..
अन्यथा भारतासारख्या युवकांची अधिकतम संख्या असलेल्या देशात.. बेकारी.. बेरोजगारी हे शब्द परवलीचे
झाले नसते..
काम करायचे
नाही.. कष्ट करायचे नाहीत म्हणून बेकार.. बेरोजगार..
बेकार - बेरोजगार
ची अजुन एक व्याख्या.. सरकारी किंवा मोठ्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी.. कमी
पगाराची नोकरी..छोटासा व्यवसाय..दोन गाई..शेतीकरणे.म्हणजे बेकारी.. असा समज करुण
देण्यात विरोधक राजकारण्यांचा कोणी हात धरणार नाही.
पारंपारिक
उद्योग.. शेती याकडे पाठ फिरवताना शहरात जाऊन पोट भरणे इतकच काय ते ध्येय. भौतिक
सुखोपभोगासाठी पैसा कमावने एवढीच मनिषा..
महाराष्ट्रासारख्या
विकसित राज्यात परप्रांतीय कष्टकरी येतात. सेट होतात ते कष्टाने.. मेहनतीने..
आपली मुल.. ना शेती ना उद्योग ना कष्ट..मग त्यांना दोष का देता.
महाराष्ट्रात उद्योजकाना विचारा.. ते सांगतील आपली पोर काम नाही करत हो.. हे भैये
१२ तास १६ तास काम करतात ते ही कमी पगारात..
त्यांच भागत कमी
पगारात कारण.. एक बकेट..एक पातेल..बिछाना..दोन ड्रेस.. करोसीनचा स्टोह आणि ३-४
जनासाठी १०१०ची खोली हेच त्याच आयुष्य.. बाकी बचतीवर दुरदेशी सार कुटुंब पोसत
असतो.*
महाराष्ट्रीयन मुल .. त्याची
रहाणी.. एटीट्युड..८ तास काम करताना १ तास फोन कॉल १५ मिनीट मावा.. ५ वाजले की चल
भावा.. तिन मित्रांना एक फ्लॅट.. स्वयंपाक करायला मावशी.. कपडे धुवायला मावशी..
४जी मोबाईल.. विकएंड ला सिनेमा.. झालच तर महीन्यात एखादी पार्टी मग उरत काहीच
नाही..
आता तरी बदला..
महामारीच्या या आपत्तीने बरीच उलथापालथ झाली आहे. नव्यान पुन्हा जीवनाकडे
पाहण्याची गरज आहे.. स्वतः ची काम स्वतः करा..
पार्टटाइम कोर्स करा.. करत असलेल्या कामात प्राविण्य मिळवा.. शौक आवरा..
साध रहा.. बचत करा.. करत असलेल्या कामात सुधारण्यास वाव असेल तिथे सुधारणा सुचवा..
प्रगती आपोआप होईल.
बेकारी ची बेकार
चर्चा आणि परप्रांतीयांना दोश देऊन प्रश्न सुटणार नाहीत.. आत्मनिर्भर व्हा..
स्वतः, कुटुंब , समाज , राज्य आणि
राष्ट्राची गरज स्वतः भागविण्यासाठी कष्ट.. मेहनत करायला शिका.
प्रतिकुलता..परिस्थिती
याचा बाऊ करु नका..
हिंम्मत है मर्दा तो मदद है खुदा।
दुसऱ्यावर
विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर होण्याचा मंत्र
ध्यानात ठेवा..
0 comments:
Post a Comment