प्रधानमंत्री फसल बीमा योजना
![]() |
भारतीय शेतकरी |
महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजना
शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे, ज्याअंतर्गत त्यांना पेरणीपूर्व अवस्थेपासून ते काढणीनंतरच्या अवस्थेपर्यंतचा
पीक विमा काढता येईल. यामध्ये पिकाची लागवड होण्यापूर्वी किंवा काढणीनंतरही
एखाद्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर विमा कंपनी
शेतकऱ्यास नुकसान भरपाई देते. यामध्ये प्रीमियमचा मोठा भाग भारत सरकार आणि राज्य
सरकार भरत असल्या कारणाने शेतकऱ्यास
विम्याच्या रकमेपैकी फक्त 2% रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागेल.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana
ही योजना
महाराष्ट्रातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रांवर (कॉमन सर्व्हिस सेंटर) उपलब्ध
आहे. शेतकरी त्यांच्या संबंधित
कागदपत्रांसह कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन, आपला पीकविमा काढू शकतात. शेतकऱ्यांना पीकविमा नोंदणीचे
पैसे भरल्याची पावती त्वरित मिळणार आहे आणि शेतकरी लगेच भारत सरकारच्या पीएमएफबीवाय
पोर्टलवर आपला अर्ज यशस्वीरीत्या भरला असल्याची खात्री करू शकता.
पंतप्रधान पीक विमा योजना
१५ जुलै २०२० ही
पीकविमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे.
पंतप्रधान पीक
विमा योजनेद्वारे शेतकर्यांची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यात आलेली आहे.
याद्वारे शेतीमध्ये नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल व परिणामी
शेतकऱ्यांवरील ताण कमी होणार आहे. राज्यात ५०००० हून अधिक आपले सरकार सेवा
केंद्रांवर ( कॉमन सर्व्हिस सेंटर) ही सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. राज्यातील
सर्व व्हीएलईंना भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत प्रशिक्षण
देण्यात आलेले आहे.
0 comments:
Post a Comment