कोरोना काळातील खोटी गंमत.
एकदा पूर्ण नक्की वाचा.
खुप मोठ्या शोधानंतर कविड-19 बद्दल हे माहीत झाले आहे की..
1. कारमध्ये 3 व्यक्ती बसले असतील तर त्यांना कोरोना पकडणार
नाही, पण कारमध्ये चौथा व्यक्ती
बसला तर कोरोना त्याच्याकडे आकर्षित होतो.
2. बसमध्ये बसलेले 30 व्यक्ती सुरक्षित असतात एकतीसावा व्यक्ती
कोरोनाचा वाहक असु शकतो.
3. दुचाकी वर मागील
व्यक्ती हा कोरोनाच्या निशाण्यावर असु शकतो, पुढचा व्यक्ती सुरक्षित असतो.
4. कोरोना
संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत फिरत असतो.
5. रविवारी कोरोना
खुप सतर्क असतो इतर दिवशी आराम करतो.
6. तुमच्याकडे पास
असेल तर तुम्ही एका झोन मधून दुसऱ्या झोन मध्ये जाऊ शकता, कोरोना तुम्हाला काहीच करत नाही कारण तुमच्याकडे पास असेल,
तुमच्याकडे पास नसेल तर कोरोना तुम्हाला पकडणार
म्हणजे पकडणार.
7. जर तुम्ही हॉटेल
मध्ये बसुन जेवत असाल तर कोरोना तुम्हाला पकडणार आणि जर रांगेत उभे राहुन पार्सल
घेऊन घरी जेवले तर कोरोना तुम्हाला पकडणार नाही.
8. जर तुम्ही रांगेत
उभे राहुन दारू घरी जाऊन पिले तर कोरोना
वाईट वाटून घेणार नाही पण तुम्ही एकाद्या बार मध्ये बसुन दारू पिले तर कोरोना वाईट
वाटून घेतो.
9. श्रीमंतांच्या
लग्नाला थोडेफार जास्त लोकं आली तर कोरोना वाईट वाटून घेत नाही पण गरिबाच्या
लग्नाला 50 चे 51 जरी झाले तर कोरोना वाईट वाटून घेतो.
म्हणून सावधान रहा, सुरक्षित रहा, घरी रहा आणि काळजी घ्या...
आपला
संजय गायखे
जय प्रहार
मो.नं.7276117556
0 comments:
Post a Comment