रुग्णसंख्या वाढली तर आम्हाला कठोर पावले उचलून लॉक डाऊन करावा लागेल असा इशारा तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना दिला आहे.
नागपुर शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढच, आज नवीन १४४ नवीन कोरोना बाधित ३ जणांचा मृत्यू .
राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा कहर
चांगलाच पसरला आहे. गेल्या ८ दिवसांपासून मृत्युसंख्येत एकसारखी वाढ होत आहे. आज ३
जणांचा मृत्यू झाला असून मृत्युसंख्या ६० वर पोहोचली आहे तर १४४ नवीन बाधित रुग्ण
आढळले आहेत. रुग्णसंख्या ३१७१ वर पोहोचली आहे.
In Nagpur city, the number of corona patients is increasing, today 144 new corona are infected.
रुग्णांची सांख्य कमी व्हावी
याकरिता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे वस्त्यांमध्ये फिरून नागरिकांना दक्षता
घेण्याचे आवाहन करीत आहेत. रुग्णसंख्या वाढली तर आम्हाला कठोर पावले उचलून लॉक
डाऊन करावा लागेल असा इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे.
आज १४४ नवीन बाधित रुग्ण आढळले
असून रुग्णसंख्या ३१७१ वर पोहोचली आहे तर ४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९८१ झाली आहे. सध्या ११३२ ऍक्टिव्ह रुग्ण
विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
0 comments:
Post a Comment