राममंदिर आणि बकरी ईद तुलना चुकीची, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं - प्रवीण दरेकर. Comparison of Ram Mandir and Goat Eid is wrong, Imtiaz Jalil's statement is stupid - Praveen Darekar.


इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि जातीय विद्वेषातून असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन यांची तुलनाच अयोग्य आहे. 

Comparison of Ram Mandir and Goat Eid is wrong, Imtiaz Jalil's statement is stupid - Praveen Darekar.

राममंदिर आणि बकरी ईद तुलना चुकीची, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं - प्रवीण दरेकर.



मुंबई : जुलै - बकरी ईदसाठी केंद्र सरकारने केलेल्या नियमावलीवरुन एमआयएम खासदार इम्तियाज जलील चांगले आक्रमक झाले. ही नियमावली मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही, असा प्रश्नही खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
मात्र, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या टीकेवर आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि जातीय विद्वेषातून असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन यांची तुलनाच अयोग्य आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकीत मतांसाठी जलील यांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, बकरी ईदसाठी मशीद उघडण्यास तसेच प्राण्यांची कुर्बानी द्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र, कोरोना परिस्थिती पाहता महापालिका हद्दीत सूट मिळणार नाही, असे आदेश औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत. यावरून नाराज झालेल्या इम्तियाज जलील यांनी बकरी ईदसाठी सरकारने केलेल्या नियमावली मान्य नसल्याचं म्हटलं आहे. नक्की कोण अधिकारी आणि काय विचार करून, असे नियम बनवतात? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
इम्तियाज जलील यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बकरी ईदवर घातलेल्या निर्बंधांचा विरोध केला आहे. जलील म्हणाले की, बकरी ईदसाठी खेड्या-पाड्यावरुन लोक आपली जनावरे  घेऊन येत असतात. त्यांनी काय करायचं? यावेळी त्यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेलाही विरोध केला.

श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतील. मात्र गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे? असा सवालही त्यांनी केला आहे. यासोबतच ज्यांच्याकडे केवळ एक-दोन बकरे असतात, त्यासाठी त्यांनी आता काय यासाठी फोन घ्यायचा का? असा सवालही त्यांनी केला आहे.


SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment