माझा वाढदिवस साजरा करण्या ऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी द्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन. Donate to CM Assistance Fund instead of celebrating my birthday - Chief Minister Uddhav Thackeray's appeal.


'आपण वाढदिवस साजरा करणार नसून कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी.

माझा वाढदिवस साजरा करण्या ऐवजी  मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी द्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.


ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन. Donate to CM Assistance Fund instead of celebrating my birthday - Chief Minister Uddhav Thackeray's appeal.

मुंबई दि.२३:- 'आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत', असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे. आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले. २७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
गेल्या ४ महिन्यांभपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान ,प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे.




SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment