देशाचे नेतृत्व करण्याची व देशाला परमवैभवाकडे नेण्याची क्षमता असणारे व्यक्तिमत्व म्हणजे - देवेंद्रजी फडणवीस.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि
विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा आज 50 वा
वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख जेष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांनी लिहिला आहे.
नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असलेले
शहर म्हणून ओळखले गेले आहे. या शहराने आजवर भारताला अनेक मान्यवर दिलेले आहेत.
मात्र असे असले तरी राष्ट्रीय नेतृत्व करणारे असे फारसे नागपूरकर आजवर समोर आलेले
नाही. नाही म्हणायला पं. बच्छाराज व्यास, कॉ. ए.बी. बर्धन आणि तिसरे नितीन जयराम
गडकरी ही तीनच नावे आजवर घेतली जात होती. यातल्या पं. बच्छाराज व्यास यांनी काही
काळ तत्कालिन भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. मात्र त्यावेळी जनसंघ हाच व्यापक
जनाधर असलेला पक्ष म्हणून पुढे आला नव्हता. हाच प्रकार भाई बर्धन यांच्या
संदर्भातही झाला. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले
गेले होते. मात्र त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला फारसा जनाधार राहिला
नव्हता. त्यामुळे आपल्या नागपूरी कर्तृत्वाची छाप व्यास किंवा बर्धन या दोघांनाही
पाडता आली नव्हती.
नितीन
जयराम गडकरी हे मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले त्यावेळी भाजप हा देशातील
सर्वोच्च सत्तेचा दावेदार बनला होता. राष्ट्रीय स्तरावर भाजपला मान्यता होती.
गडकरी या नावालाही महाराष्ट्रात एक वलय निर्माण झाले होते. त्यामुळे नितीन
गडकरींना राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा निर्माण करण्यात बर्यापैकी यश लाभले
होते. पंतप्रधानपदाचे भावी दावेदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चाही सुरु झाली
होती. पक्षातंर्गत राजकारणामुळे ते मागे पडले खरे, मात्र आजही त्यांची
राष्ट्रीय स्तरावरील नेता म्हणून निर्माण झालेली प्रतिमा कायम आहे आणि भविष्यातही
ही प्रतिमा कायम राहणार आहे हे वास्तव त्यांचे विरोधकही मान्य करतात.
याच
यादीत चौथे नाव पुढे येेते आहे ते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचे. महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय
स्तरावरही फडणवीसांनी आपला दरारा निर्माण करण्यात आज आघाडी घेतलेली दिसते आहे. याच
पद्धतीने ते पुढे जात राहिले तर अजून 10 ते 15 वर्षात देशाचे नेतृत्व
करू शकतील असे सर्व गुण त्यांच्यात आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. देवेंद्र
गंगाधरराव फडणवीस हे नागपुरात जन्मलेले आणि इथेच लहानाचे मोठे झालेले सधन
मध्यमवर्गीय कुटुंबातील भाजप कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस
हे देखील जुन्या जनसंघाचे आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते.
ते काही काळ नागपूरचे उपमहापौरही होते. त्यानंतर दीर्घकाळ
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती. अशी राजकीय
पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून देवेंद्र फडणवीसांची जडणघडण झाली. लहानपणापासून
संघाचे ते स्वयंसेवक होते. वयाच्या 18व्या
वर्षीच
वडिलांचे निधन झाले. त्यावेळी देवेंद्र लॉचे विद्यार्थी होते. त्या काळात संघाचा
पूर्णवेळ कार्यकर्ता व्हायचे असे त्यांचे स्वप्न होते. मात्र नियतीच्या मनात काही
वेगळेच होते.1992 मध्ये नागपूर महापालिकेच्या निवडणूका आल्यात. त्यावेळी
संघानेच
त्यांना भाजपात जाऊन निवडणूक लढव असा आदेश दिला. त्या आदेशाचे पालन करीत त्यांनी
निवडणूक लढविली आणि विजयी झाले. तिथून त्यांची राजकीय वाटचाल सुरु झाली. आपल्या
अभ्यासू कार्यशैलीमुळे अवघ्या पाच वर्षात ते नागपूरचे महापौर
बनले. नंतरच्या तीन वर्षातच ते विधानसभा सदस्य बनले. 2012
मध्ये
ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले आणि 2014 मध्ये महाराष्ट्रातील
भाजपचे पहिले मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
फडणवीसांची
ही राजकीय वाटचाल बघितल्यास जे काही मिळाले ते फक्त नशीबाने असे म्हणणे उचित होणार
नाही. यात फडणवीसांचे असलेले कर्तृत्व हे देखील नाकारता येणार नाही. आपल्या राजकीय
वाटचालीत एक स्वच्छ चारित्र्याचा, धडाकेबाज कार्यशैलीचा
अभ्यासू राजकीय नेता म्हणून त्यांनी स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आणि ती
प्रतिमा त्यांनी कायम जपली. त्यामुळेच ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार
हे निश्चित झाले, त्यावेळी
भाजपचा पुढचा नेता म्हणून तत्कालिन भाजपा श्रेष्ठींनी महाराष्ट्राचा नेता म्हणून
देवेंद्रजींचे नाव निश्चित केले. मिळालेल्या संधीचे देवेंद्रजींनी पूर्णतः सोने
केले हे सूर्यप्रकाश इतके सत्य आहे.
2019 च्या विधानसभा निवडणूका भाजपने देवेंद्र फडणवींसाच्या नेतृत्वातच
लढवल्या. यावेळी देखील ते मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित होते. मात्र जे
काही पडद्याआडचे राजकारण घडले त्यामुळे त्यांना विरोेधीपक्ष नेता म्हणून जबाबदारी
स्वीकारावी लागली. मात्र एक जागरुक विरोधीपक्ष नेता म्हणून त्यांनी आज आपली
प्रतिमा निर्माण केली आहे.
महाराष्ट्रात
2019 मध्ये भाजपची सत्ता येऊ शकली नाही. त्यावेळी आता पंतप्रधान नरेंद्र
मोदी फडणवीसांना दिल्लीत नेऊन राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी देणार अशी चर्चा जोरात
सुरु झाली. त्याचवेळी फडणवीस राष्ट्रीय स्तरावर यशस्वी
होतील
का याबाबतही अडाखे बांधणे सुुरु झाले.
दिल्लीचा
इतिहास बघता आजवर देशाचे नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राकडे एकदाही आलेली नाही.
अगदी पेशव्यांनीही दिल्लीपर्यंत धडक मारली होती. मात्र ते तिथे पोहोचू शकले नाही.
स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक नेते दिल्लीत पोहोचले
मात्र
पंतप्रधानपदापर्यंत जाणे त्यांना शक्य झाले नाही. आज मात्र नितीन गडकरी हे नाव
प्रामुख्याने दिल्लीत घेतले जाते आणि गडकरींनी आपली कार्यक्षमता सिद्धही केली आहे.
गडकरींचे
वय आज 65
च्या आसपास आहे. त्यामुळे अजून कितीकाळ ते राजकारणात सक्रिय राहणार हा प्रश्न
येतोच. असे असले तरी काही काळ देशाचे नेतृत्व करतील याबाबत कोणाच्याही मनात शंका
नाही. त्यानंतर मात्र देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे देशाचे नेतृत्व करण्याइतपत
सक्षम आहे असा बहुसंख्य मराठी माणसांना निश्चितच विश्वास आहे.
आपला
माणूस सर्वोच्चपदी जावा. ही अपेक्षा प्रत्येकाचीच असते. मात्र त्यासाठी ती
क्षमातही त्या व्यक्तिमध्ये असायला हवी. ही क्षमता फडणवीसांमध्ये आहे काय हा प्रश्नही
निर्माण होतो. त्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास फडणवीस हे उच्च विद्याविभूषित
आहेत. एलएलबीची परीक्षा त्यांनी सुवर्णपदक मिळवून उत्तीर्ण केली आहे. व्यापक
जनसंपर्क आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ही त्यांची विशेषता आहे. अभ्यासू
व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीच्या काळात ख्याती मिळविली आहे. एक
कुशल प्रशासक म्हणून ते काम करू शकतात हे त्यांनी दोन वर्षाच्या महापौरपदाच्या
कार्यकाळात आणि पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दाखवून दिलेले आहे.
आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांची त्यांना पूरेपूर जाण आहे. आणि त्या
समस्यांची उत्तर कशी शोधावे कितपत चातुर्यही त्यांच्याकडे आहे.
सगळ्यात
महत्त्वाची बाब म्हणजे 2012 ते 2014 या कालखंडात त्यांनी महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून
बजावलेली कामगिरी 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री म्हणून मिळालेला कालखंड यामुळे राष्ट्रीय
स्तरावर व्यापक जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी
स्वतःची एक वेगळी अशी प्रतिमा निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्तरावर फक्त
भाजपमध्येच नाही तर सर्वच पक्षात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. यासर्व बाबींचा
परिणाम म्हणून की काय पण आज राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नावाला स्वीकारार्हता
प्राप्त झालेली आहे. कोणत्याही टप्प्यावर नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून पुढे
जाण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संघाच्या मुशीतून
जडणघडण झालेले देवेंद्रजी सत्तेच्या मागे न धावता दिलेली जबाबदारी निष्ठेने पार
पाडणार्यांपैकी एक आहेत.
इथे
आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो. राजकीय नेत्याने व्यक्तीगत आणि कौटुंबिक
चारित्र्य सर्वप्रथम जपायला हवे. आज कोणताही राजकीय नेता आणि त्यातही दोन टर्म
आमदार राहिलेला म्हणजे कमाईचे भरपूर स्त्रोत असतात असे गृहित धरले जाते. 2ै005
मध्ये
देंवेद्रजींनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भावी वधू अमृता रानडे
यांना पहिल्या भेटीत देवेंद्रजींनी आपली आमदार म्हणून काहीही कमाई नसल्याचे स्पष्ट
केले होते. त्यावेळी अमृता रानडे या एका बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होत्या. मी
तुला घर चालवायला काहीही पैसा देऊ शकणार नाही असे पहिल्याच भेटीत देवेंद्रजींनी
स्पष्ट केल्याची आठवण अमृता फडणवीसांनी प्रस्तुत स्तंभ लेखकाला एका मुलाखतीच्या
दरम्यान सांगितली होती. यावरून त्यांचे स्वच्छ चारित्र्य स्पष्ट होतेच.
हे सर्व
मुद्दे लक्षात घेता देवेंद्रजी राष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करून
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली
परंपरा पुढे निश्चित चालवू शकतात. इतकेच नव्हे तर एक पाऊल पुढे या न्यायाने
देशाला
परमवैभवाकडेही
ते नेऊ शकतात हा त्यांच्या समर्थकांचा भाबडा विश्वास नसून हे एक वास्तव म्हणून
सर्वांनाच स्वीकारावे लागते.
आज 22 जुलै, देवेंद्र फडणवीसांचा 50वा वाढदिवस, आज ते 51 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना
अजून दीर्घकाळ राजकारण करण्याची संधी आहे. अर्थात समाजकारण जास्त आणि राजकारण कमी
या मानसिकतेत घडलेले
असल्यामुळे
देवेंद्रजी समाजकारणाकडेच लक्ष देतात हे त्यांचे विरोधकही सांगतील म्हणूनच आज
कोरोनाचे संकट असताना उभ्या महाराष्ट्रात फिरून जनतेला धीर देण्याचे आणि
प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम ते तितक्याच तडफेने करत आहेत. त्यांच्या या वाटचालीत त्यांना
पुढे राष्ट्रीय स्तरावर जाण्याची आणि देशाचे नेतृत्व करून देशाची प्रतिमा
आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याची संधी निश्चित मिळू शकते. आधी नमूद
केल्याप्रमाणे आजवर मराठी माणसाला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही.
अगदी जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणार्या मराठी नेतृत्वाला आज पावसात
भिजण्यापलीकडे फारसे काम राहिलेले नाही. मात्र आजच्या परिस्थितीत गडकरी आणि फडणवीस
ही दोन
नावे
राष्ट्रीय स्तरावरील भावी नेतृत्व म्हणून घेतली जात आहेत. आज पन्नाशी पूर्ण करणार्या
देवेंद्रजींना भावी आयुष्यात या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी ही त्यांच्या
असंख्य चाहत्यांचीच नव्हे तर बहुसंख्य मराठी जनांची मनोमन इच्छा आहे. दिल्लीचे तक्त मराठीने राखावे हे
पूर्वासुरींचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता देवेंद्रजींमध्ये निश्चित आहे. त्यांनी
देशाचे नेतृत्व करावे आणि देशाला परमवैभवाकडे न्यावे हीच त्यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त नागपूर इन्फो डॉट
इनच्या वतीने
हार्दिक
शुभेच्छा!
-अविनाश पाठक
-अविनाश पाठक
0 comments:
Post a Comment