शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री जाणारच अशी
भूमिका जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या जाण्यावरुन राजकारण तापण्यास सुरुवात झाली.
राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन राजकीय वातावरण तापले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले
आहे. परंतु, राष्ट्रवादीचे
नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी मात्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी
या कार्यक्रमाला जावू नये, असं आवाहनच
मेमन यांनी केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री
जाणारच अशी भूमिका जाहीर केली आहे.
माजिद मेमन यांनी ट्वीटकरून
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राम मंदिराच्या
भूमिपूजन सोहळ्याला हजर राह्याचे की नाही? याबाबतचा ते स्वत: निर्णय घेऊ
शकतील. मात्र, लोकशाही
व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊ नये' असे मत मेमन यांनी व्यक्त केलं.
तसेच, व्यक्ती म्हणून उद्धव ठाकरे यांना
धर्म पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यापासून त्यांना कोणीही रोखणार नाही. पण, महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष हे
धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे
एका पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी जाणे टाळावे, असंही मेमन म्हणाले.
त्याचबरोबर मेमन यांनी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराबद्दल केलेल्या विधानाबाबतही
भाष्य केले. शरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून निव्वळ राजकारण
करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींचे प्राधान्य कशाला हवे होते? याबद्दल त्यांनी हे विधान केले
होते.
तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार
संजय राऊत यांनी 'राम मंदिर
हा राष्ट्रीय अस्मितेचा हा मुद्दा आहे. माजिद मेमन यांचे मत मला माहिती नाही.
सरकार किमान कार्यक्रमावर चालावं असं आमच्या सरकारचा आधार आहे. हा सरकारचा अजेंडा
नाही' असे स्पष्ट
केले आहे.
'राम मंदिर भूमिपूजनाचा शासकीय
कार्यक्रम आहे. खरेतर अनेक राम भक्तांची निराशा होणार आहे. अनेक जणांना या
सोहळ्याला जाता येणार नाही. अनेक नियंमांचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी या कार्याला
गती मिळावी म्हणून प्रयत्न केला. या सरकारला 100 दिवस झाल्यानंतरही उद्धव ठाकरे
जाऊन आले होते. त्यामुळे या सोहळ्याला उद्धव ठाकरे आयोध्येत जातील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राममंदिराच्या शुभारंभाला जायचे
नाही तर काय मशीद किंवा चर्चच्या भूमिपूजनाला जायचे का? असा प्रश्न शिवसैनिक विचारू लागले
आहेत. एकूणच प्रकारात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे
धर्मसंकटात सापडणार हे स्पष्ट दिसते आहे.
0 comments:
Post a Comment