ठाकरे यांनी मी हा इथेच बसलोय. सरकार पाडून दाखवा, अगदी मुलाखत सुरु असताना पाडा, असे आवाहन विरोधी पक्षाला दिले.
आघाडीचे सरकार आजच पाडून दाखवा.
मुंबई, 25 जुलै : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवाच, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला आहे. मी आजही आपली
सही आपला नम्र अशी करतो आणि आपल्याला खुर्चीचा मोह नाही, असा
टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते आणि दै. सामनाचे कार्यकारी संपादक
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर
ठाकरे यांनी प्रथमच दीर्घ मुलाखत दिली आहे. आज या मुलाखतीचा पहिला भाग दै.
सामन्यामध्ये प्रकाशित झाला. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार
पडण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. राजस्थानच्या धर्तीवर
महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस होणार, अशी कुजबूज होत होती. मात्र
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच राज्यातील सरकार
पाडण्याची गरज नाही, ते अंतर्विरोधाने पडेल. असे भाकीत केले
आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे यांनी मी हा इथेच बसलोय. सरकार पाडून दाखवा,
अगदी मुलाखत सुरु असताना पाडा, असे आवाहन
विरोधी पक्षाला दिले. वयाच्या साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री आहे, हा योगायोग आहे. याचसाठी केला होता अट्टाहास, असा
याचा अर्थ नाही. मी आजही माझी सही आपला नम्र अशी करतो. मला पदाचा मोह नाही,
असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांना
स्पर्श केला आहे. शरद पवारांच्या रामजन्मभूमीच्या संदर्भातील विधानेचेही त्यांनी
समर्थन केले आहे. विरोधकांना होत असलेली पोट दुखी थांबवी असे सांगताना जनतेचा
आशीर्वाद असल्यामुळे आवाहनांची पर्वा नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत ई-लर्निंग हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले.
मुलाखतीचा दुसरा भाग उद्याच्या दै.
सामन्यामध्ये प्रकाशित होण्याची माहिती आहे.
0 comments:
Post a Comment