अयोध्येत भूमिपूजनासाठी 300 लोक एकत्र होणार आहेत. या कार्यक्रमामुळेा कोरोनाचे संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता आहे. : पत्रकार साकेत गोखले याचिकाकर्ते
उच्च न्यायालयाने राममंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणारी याचिका फेटाळली.
प्रयागराज, 25 जुलै : अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाला
विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. राममंदिराचे भूमिपूजन म्हणजे
टाळेबंदी उघडतांना जी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. त्यांचे उल्लंघन
असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. मुंबईतील पत्रकार साकेत गोखले याने
पत्राद्वारे ही याचिका दाखल केली होती.
अयोध्येत भूमिपूजनासाठी 300 लोक एकत्र होणार आहेत. या
कार्यक्रमामुळेा कोरोनाचे संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने
टाळेबंदी उठवली असली तरी काही नियम अजूनही अस्तित्वात आहेत आणि यातून उत्तरप्रदेश
सरकारला सूट मिळू शकत नाही. हा याचिकाकर्त्याच्या वकिलाचा युक्तिवाद मुख्य
न्यायमूर्ती गोविंद माथूर आणि न्या. एस.डी. सिंह यांच्या खंडपीठाने फेटाळताना,
याचिकाही खारीज केली. याचिकाकर्त्याने याचिकेत राममंदिर
तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळासह केंद्र सरकारलाही पक्षकार बनविले आहे. बकरी ईदला
देखील सामूहिक नमाज करण्याची परवानगी नाकारण्यात आली असल्याचा उल्लेख केला आहे.
बकरी इदेच्या सामूुहिक समाजाला परवानगी नसताना, अयोध्येत 30 लोकांच्या सामूहिक कार्यक्रमाला परवानगी कशी दिली जाऊ शकते. असा सवाल
त्याने उपस्थित केला आहे. यावर न्यायालयाने असे स्पष्ट केलेे की, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्य सरकार आवश्यक ती काळजी नक्कीच घेत आहे.
0 comments:
Post a Comment