दुचाकींचा वेग कमी करण्यास सांगितले. दुचाकींचा वेग कमी होताच निखिल याने काही कळायच्या आत पुलावरून नदीपात्रात उडी मारली.
वैनगंगेच्या पुलावरून उडी घेत युवकाने केली आत्महत्या.
भंडारा : - घरून सायंकाळच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पुलाकडे पायी
फिरायला निघालेल्या युवकाने भावासमोरच पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. हि घटना
रविवार १९ जुलै रोजी सायंकाळी घडली.
निखिल दिवाकर हटवार (१९) असे
मृतकाचे नाव आहे. बेलघाटा वार्ड पवनी येथील रहिवासी आहे. सदर युवक हा मागील काही
दिवसांपासून नैराश्याने ग्रासलं होता. यामुळे तो कुठेही बाहेर जात असल्यास त्याला
घरची मंडळी शोधात असायची . रविवारी सायंकाळी वैनगंगा नदीकडे जात फिरायला जात
असल्याचे त्याचा भाऊ युगल ला कळताच चुलतभाऊ अक्षय याला सोबत घेऊन मोटारसायकलने
त्याला पाहावयास गेले. त्यांना कोरंभी नाक्याजवळ निखिल दिसला. युगल याने तू कुठे
निघालास? अशी
विचारणा केली असता सिंधपुरी येथील बुद्धविहारात जात असल्याचे सांगितले. यामुळे
त्याला गाडीवर सोबत घेऊन तिघेही बुद्धविहाराकडे फिरावयास गेले. मात्र परत येत
असताना निखिल याने दुचाकींचा वेग कमी करण्यास सांगितले. दुचाकींचा वेग कमी होताच
निखिल याने काही कळायच्या आत पुलावरून नदीपात्रात उडी मारली.
निखिल हा वर्धा येथे डी. फार्म.
चे शिक्षण घेत असून कॉलेज बंद असल्यामुळे घरी आला होता. निखिल याने नदीत उडी घेताच
रस्त्याने ये जा करणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. रात्री ढिवर बांधवांच्या
मदतीने शोधाशोध केली. पण मृतदेह मिळून न आल्याने सोमवारी सकाळी शोधकाऱ्यास पुन्हा सुरुवात
करण्यात आली असता मृतदेह पुलापासून काही अंतरावर दिसून आला. उत्तरीय तपासणी करून
मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला.
0 comments:
Post a Comment