सिंधूबाई सोनुने यांनी जिवंत चालत्या बोलत्या गौरी (महालक्ष्मी) अशा प्रकारे सोहळा साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
नागपूर : २७ ऑगस्ट - राज्यभरात गौरीचा ( महालक्ष्मी) सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, वाशिम शहरातील सिंधुबाई सोनुने ही महिला चक्क आपल्या दोन्ही सुनांचं गौरी म्हणून त्यांचं पूजन करतात. यंदाही सिंधुबाईंनी मोठ्या उत्साहात चालत्या बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सुनच असते, असा संदेश समाजाला दिला आहे.
वाशिम शहरात राहणार्या श्रीमती सिंधुबाई सोनुने यांनी यावर्षी मंगळवारी आपल्या दोन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून मखरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं बसवत त्यांची पूजन करून उत्सव साजरा केला. सिंधूबाई सोनुने यांनी जिवंत चालत्या बोलत्या गौरी (महालक्ष्मी) अशा प्रकारे सोहळा साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हा अनोखा गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी केली होती. या गौरी सोहळ्यामधून सासू आणि सुनांमधील प्रेम, सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, असा आपला उद्देश असल्याचं सिंधुबाई सोनुने यांनी सांगतलं आहे.
0 comments:
Post a Comment