चिंचोली वरून शेगाव कडे येत असलेल्या एका छोटा हत्ती वाहनातून संशयास्पदरित्या जात असलेला तांदूळ व वाहन असा एकूण २ लाख २५ हजाराचा ९८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बुलढाणा : २८ ऑगस्ट - खामगाव तालुक्यातील चिंचोली वरून शेगाव कडे येत असलेल्या एका छोटा हत्ती वाहनातून संशयास्पदरित्या जात असलेला तांदूळ व वाहन असा एकूण २ लाख २५ हजाराचा ९८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई एसडीपीओ प्रदीप पाटील यांच्या पथकाने केली. या वाहनात जवळपास २० ते २५ क्विंटल तांदूळ असल्याचा प्राथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिंचोली येथून शेगावकडे जाणाऱ्या टाटा एस मालवाहन क्र. एमएच १२ क्युबी ३६८९ या वाहनांची तपासणी केली असता नमूद वाहनामध्ये वाहनचालक मो. आकिब,अ. वाहिद (२३), अ. तन्वीर अ. तैमूर (३०), मो. फैजन राजा अ. कलाम (२०) सर्व राहणार बार्शीटाकळी जिल्हा अकोला हे तिघे जण तांदुळाचा अंदाजे २० ते २५ क्विंटल माल संशयास्पदरित्या घेऊन जाताना सापडले. त्यांना सदर मालाबाबत विचारणा केली असता त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याने व त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर तांदूळ अंदाजे किंमत २५ हजार रुपये, टाटा एस वाहन किंमत २ लाख रुपये, एक डिजिटल ताणकाटा किंमत ८०० रुपये, १६ नग पांढऱ्या पोतल्या किंमत १६० व इतर साहित्य असा एकूण २ लाख २५ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ग्रामीण येथे जमा करण्यात आला असून पुढील कारवाईकरिता शेगाव तहसीलदारांना कळविण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment