वाशीम : २८ ऑगस्ट - रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील विवाहित महिलेने अनैतिक प्रेमसंबंधातून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
फिर्यादीत म्हटले की, रिसोड तालुक्यातील ग्राम शेलू खडसे येथील आरोपी प्रकाश श्रीराम खडसे यांच्याशी या विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. फिर्यादी सचिन विलास खडसे याने त्याच्या आईला याबद्दल विचारणा केली असता, त्या महिलेने हे प्रेमप्रकरण थांबविले, परंतु आरोपी याने त्या महिलेला, तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर गावात तुझी बदनामी करिन अशी धमकी दिली होती, असे फिर्यादीने म्हटले आहे. या कारणावरून फिर्यादीच्या आईने फाशी घेऊन आत्महत्या केली. या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment