अकोला येथील शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात येऊन तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने चिमुकलीचे प्राण वाचले.
अकोला : २८ ऑगस्ट - आई शेतात काम करीत असताना झाडाखाली बसलेल्या दोन वर्षीय चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला चढवून तिच्या चेहऱ्याचे अक्षरशः लचके तोंडल्याची घटना अकोट तालुक्यातील पिकलवाडी शेतशिवारात घडली. भेदरलेली मुलगी जिवाच्या आकांताने रडताना दिसल्यानंतर आईने तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. सदर मुलीला तातडीने अकोला येथील शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात येऊन तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने चिमुकलीचे प्राण वाचले. शुभेच्छा निलेश मोरोदे असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
शुभेच्छाचे आई वडील नेहमीप्रमाणे बुधवारीसुद्धा तिला शेतावर घेऊन गेले होते. स्वतः शेतात काम करीत असताना चिमुकलीला त्यांनी शेतातील एका झाडाजवळील मंदिरात बसवून ठेवले. या ठिकाणी ती खेळात होती. तर आई वडील कामात व्यस्त होते.
दरम्यान, अचानक चार ते पाच कुत्र्यांचा कळप चिमुकलीवर धावून आला. आणित्यांनी तिच्यावर हल्ला चढविला. यावेळी कुत्र्यांनी तिच्या हनुवटीच्या अक्षरशः लचके तोडले. यामुळे भेदरलेल्या चिमुकलीने टाहो फोडला. तिचा आवाज एकूण काही तरी विपरीत घडल्याच्या संशयावरून तिच्या आईने तिच्याकडे धाव घेतली. तेव्हा चिमुकलीचे चार ते पाच कुत्रे लचके तोंडात असल्याचे तिला दिसून आले. आईने कशी बशी चिमुकलीचे कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली.
रक्तबंबाळ अवस्थेत चिमुकलीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिमुकल्या शुभेच्छाची अवस्था पाहून डॉ. पराग डोईफोडे यांनी तात्काळ तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली. चिमुकलीवर तात्काळ उपचार व्हावे म्हणून वंचितचे पराग गवई यांनी विशेष सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment