उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्याचे नेतृत्व करावे : खा. संजय राऊत. Uddhav Thackeray should lead non-BJP ruled state: MP Sanjay Raut

 महाराष्ट्रतेलंगकेरळतामिळनाडूझारखंडराजस्थानपश्चिम बंगालओरिसापंजाबआंध्र प्रदेश ही बिगर भाजपशासित राज्ये आहेत.
 उद्धव ठाकरे को गैर-भाजपा शासित राज्य का नेतृत्व करना चाहिए: मप्र संजय राउत
मुंबई दि. २७: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी सामनातून केल्यांनतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर तिचा पुनरूच्चार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्याचे नेतृत्व करावेसे संजय राऊत यांनी वाहिन्यांशी बोलताना म्हटले आहे. महाराष्ट्रतेलंगकेरळतामिळनाडूझारखंडराजस्थानपश्चिम बंगालओरिसापंजाबआंध्र प्रदेश ही बिगर भाजपशासित राज्ये आहेत. कालच या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न घाबरता एकजूट करण्याचे आवाहन या मुख्यमंत्र्ना केले होते. या पार्श्वभुमीवर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी 'सामना'तून पूर्वीच करण्यात आली होती असे राउत म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईलअसा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नाराजीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवल्याबाबत भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, "तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असतेच. संजय जाधव मुंबईत आलेले आहेतयातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. जी समन्वय समिती आहे ती सरकारच्या कामकाजासाठी आहे. तिन्ही पक्षांतर्गत समन्वय समितीची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु गरज पडल्यास पुन्हा विचार करु."
मागील काही दिवसात निधी वाटपावरुन काँग्रेस आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टिका केली. "तीन पक्षाचं सरकार असताना निधी वाटपास आमदार आणि खासदारांची नाराजी आहे. पण केंद्राने निधी गोठवल्यामुळे अडचण आहे," से संजय राऊत म्हणाले. निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत जालन्याच्या कॉंग्रेस 
आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी संवाद साधला आणि निधी वाटपात दुजाभाव केला जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे उपोषण रद्द करण्यात आले.
SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment