युवासेनेने आपल्या निवेदनात म्हटले की, आयुक्त मुंढे यांनी जेव्हापासून नागपूर महापालिकेचा कार्यभार हाती घेतला़ तेव्हापासून मनपात विकासकामांच्या मुद्यांवरून होणारी लाखो रुपयांची लूट थांबली़ आहे.
नागपूर : २७ ऑगस्ट - अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली़ शहरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व महापालिकेतील गैरव्यवहाराला मुंढे यांच्या शिस्तप्रिय धोरणामुळे चाप बसला़ त्यांची बदली तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी गुरुवारला युवासेनेने आंदोलनातून केली़
याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे़ युवासेनेने आपल्या निवेदनात म्हटले की, आयुक्त मुंढे यांनी जेव्हापासून नागपूर महापालिकेचा कार्यभार हाती घेतला़ तेव्हापासून मनपात विकासकामांच्या मुद्यांवरून होणारी लाखो रुपयांची लूट थांबली़ मान्सूनपूर्व नाले सफाई अभियान, कोविड-१९ साठी जम्बो हॉस्पिटलची निर्मिती, ही मोठी उपलब्धी आहे़ त्यांच्या अनुभव आणि अभ्यासामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकले़ या कामगिरीमुळे ते नागपूरकरांत लोकप्रिय झालेत़ शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायमचा संपत नाही व विकासाचे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागत नाही तोवर त्यांची बदली करण्यात येऊ नये़ अन्यथा युवासेनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारासुद्धा दिला आहेत़ हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना उत्तर नागपूर विधानसभा युवा अधिकारी गणेश सोळंके आणि शिष्टमंडळाने पाठविले आहे़.
0 comments:
Post a Comment