कोरोना महामारी संकट काळात कोणासाठी तरी देव बना..! Be a god for someone during the Corona epidemic crisis ..!

मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै....
अजूनही किती महिने कोरोनाचा कहर चालेल माहित नाही
सुरूवातीला काही दिवस सहजतेने गेले आणि आता संयमाचा बांध सुटला एकमेकांना फोन करून उधार उसनवारी दिलेले पैसे मागायला सुरूवात झाली कोणी व्याज मागायला सुरुवात केली कोणी राहत्या घराची व व्यवसायाच्या जागेची भाडे मागायला सुरुवात केली ..
 इतके दिवस थांबलो आता नाही थांबणार असे फोन सुरू झाले, पण कोणाच काहीच सुरू नाही मग मित्रांनो तुम्ही ज्याला मागताय तो देणार कोठून?  हा विचार आपण केलाय का?
तो जिथ जगतोय तिथेच आपणही आहोत .
 जे संकट त्याच्यावर आहे तेच तुमच्यावर आहे.
चूक कोणाचीच नाही निर्सगाने सर्वावर सारखीच अवकृपा केली आहे. थोडा माणुस म्हणून विचार करा जो आजारातून वाचेल तो ताण सहन नाही झाला तर आत्महत्या करेल कोणाच्याही कुटुंबाला उध्वस्त करण्याच पाप करू नका.
जगला वाचला तर आज ना उद्या देईल पैसे पण माणूसकी हरवू नका एवढीच विनंती आहे.
आजारपण, मुलांच्या शाळा, बँकेचे हप्ते, जागेचे भाडे, टॅक्स, शेताचा खर्च,
गावाकडे पाठवावे लागणारे पैसे, अनेक समस्या आहेत पण पुन्हा उभे रहावे लागेल... एकमेकांच्या मदतीने.
ज्याच्या कडे तुमचे पैसे आहेत तो क्षणभर मेला असा विचार करा व त्याला संधी द्या. ईतक्या वर्षाचे संबंध  क्षणात तोडू नका हे दिवस जगवण्याचे व जगण्याचे आहेत.
अनेक लोकांशी बोलताना जाणवत की ते आतून हलले आणि धास्तावले आहेत.
कस जगायचं यापेक्षा लोकांना तोंडकसं द्यायचे हाच विचार प्रत्येकजण करतोय.
 *माणसाचा जन्म मिळालाय गिधाडे होऊन विचार करू नका
या परिस्थितीत स्वतःला व इतरांना सांभाळून घ्या तो
माणूस तुमचे उपकार आयुष्यात कधीच विसणार नाही.
 व्यवहार कोणालाही चुकला नाही व चुकणारही नाही
 देवांनीही देऊळ बंद केलेय आता तुम्ही त्याचं काम करा कोणासाठी तरी देव बना कदाचीत देवालाही हेच अपेक्षित असेल.. माझ्या दारात इतके दिवस येणारा माणूस खरच माणूस झालाय का हेच अपेक्षित असेल त्याला.
नाहीतरी तो हिशोब ठेवणारच आहे सर्वांचा.
 मदत व सेवा हेच देवाचं दुसरं रूप आहे.
ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व कोणाच्यातरी आयुष्यात देवदूत बना.
 माणूस बना देश उभा करण्यासाठी अशी संधी पुन्हा नाही..
 जय हिंद.. जय भारत जय महाराष्ट्र..
SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment