पाणी पिण्याच्या टाकीचे अतिशय बोगस पद्धतीने काम सुरु आहे
थेरगांव (पिंपरी-चिंचवड) येथील सर्वे नं.9 शनि हनुमान मंदीर जवळील येथे नवीन पिण्याच्या टाकीचे काम सुरु आहे.
लाॅकडाऊन झाल्या पासुन शेजारी पाण्याची व्यवस्था असताना पण गेले तीन महिने अजिबात एक थेंब पण काॅलमला पाणी मारले नाही आणि ठेकेदार ते लपवण्याकरीता युद्द पातळीवर ते काॅलम झाकण्याचे काम करत आहे.
25 डिसेंबर 2016 रोजी बाजुच्या टाकीचे उदघाटन करण्याकरीता तत्कालीन उपमुख्यंञी अजितदादा पवार हे आले होते त्यांनी त्यावेळेसचे तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे व तत्कालीन महापौर शकुंतला धराडे व अनेक मान्यवरांच्या समोरच सदरील टाकीचे काम निकृष्ठ दर्जाचे आहे तसे सांगितले होते ऊदघाटन करताना आणि त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका असे पण बजावले होते.
नागरीकांनी आवाज उठवा.
आता नवीन होणारी टाकी पण निकृष्ठ दर्जाची होणार आहे तरी सर्व रहाटणी काळेवाडी थेरगांव येथील सर्व नागरीकांनी जाब विचारणे गरजेचे आहेमाझ्याकडे लाॅकडाऊन काळातील फोटो पण आहे पाणी न मारलेलेचे.
मनपा पाणी पुरवठा विभागाने त्वरीत ते काम थांबवावे अन्यथा आपल्याला प्रहारच्या रोषाला सामोरे जावे लागेल .आपला
संजय गायखेजय प्रहार
मो.नं.7276117556
0 comments:
Post a Comment