!!!!! खरे शिल्पकार !!!!!!
स्वर्गीय.नामदार प्रा रामकृष्ण मोरे सर.
![]() |
Prof. Ramakrishna More Sir |
रुग्णालयाची ऊभारणी करताना काही नाठाळांनी हे रुग्णालय म्हणजे पांढरा हत्ती असे संबोधले होते पण तेच आज तेथे उपचार घेण्याकरीता धावपळ करत आहेत असो.
सरांनी रुग्णालयाची ऊभारणी केल्यामुळे तेथे अनेकांना नोकरी मिळाली डाॅक्टर,नर्स,वार्डबाॅय,आया,शिपाई,वाचमेन,या सर्वाना आप आपले कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळाली तसेच रुग्णालया बाहेर मेडीकल वाला चहावाला वडापाव वाला नारळ पाणी विकणारा पेपर वाला रिक्षावाला
अशा अनेक प्रकारच्या व्यवसाय करणारांची हजारो लाखो जणांची पोटा पाण्याची कायमची सोय करुन दिली तसेच या रुग्णालयात गोर गरीबांना परवडेल असे उपचार आजही मिळतात म्हणुन तर दररोजच गर्दी होत आहे आणि रुग्णांना दिलासा मिळत आहे.
या सर्वाचे श्रेय फक्त तुमच्या आमच्या सरांना जात आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरांच्या जीवावर जे मोठे झाले ते माञ सरांना विसरले.अहो त्या रुग्णालयात साधा सरांचा एक शानदार फोटो नाही हिच मोठी शोकांतिका आहे
मी कोरोनाचे संकट गेल्यावर सरांचा भव्य फोटो असलेला कटाऊट दर्शनी भागातलावण्याची मागणी करणार आहे,
आणि तो जर मनपाने नाही लावला तर स्वखर्चाने लावणार आहे.
सर खरे अर्थाने पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार ठरले आहेत हे मान्यचं करावे लागेल
सरांच्या दुरदृष्टीला माझा मानाचा मुजरा..
आपला
संजय गायखे
ठोख पण रोखजय प्रहार
0 comments:
Post a Comment