बिहार :
२० जुलै - बिहारमध्ये वादळ-वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात
झाली आहे. राज्यातील 9 जिल्ह्यात
विजा कोसळून 16 जण ठार
झाले आहेत. गेल्या तीन आठवड्यात राज्यात वीज कोसळल्याने 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला
आहे.
गया येथे चार, पूर्णियामध्ये तीन, बेगूसराय व जमुई येथे प्रत्येकी
दोन आणि पाटणा, सहरसा, पूर्व चंपारण, मधेपुरा आणि दरभंगा जिल्ह्यात
प्रत्येकी एक जण, असे 16 जण विजा कोसळल्याने ठार झाल्याचे
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीज कोसळण्याच्या घटनांमुळे
बिहारमध्ये मोठ्या प्रमाण जीवितहानी झाली आहे. गया जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या विजा
कोसळण्याच्या घटनांमध्ये चार जण ठार झाले.
आंती पोलीस स्टेशन परिसरात वीज
कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. शेतात काम करत असताना फळतपूर भागातील देवी (50) आणि प्रसादी मांझी (40) या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर
वीज कोसळल्याने 26 वर्षीय
मिंटू कुमारचाही मृत्यू झाला.
मुख्यमंत्री नितीशकुमार
यांनी वीज कोसळल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयाप्रती संवेदना
व्यक्त केल्या आहेत. कुमार यांनी मृतांच्या कुटूंबियांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचे
निर्देश दिले. तसेच त्यांनी राज्यातील जनतेला जागरुक राहण्याचे आणि खराब हवामानात
शक्य असेल तर घराच्या आत रहाण्याचे आवाहन केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेले
सल्ले पाळण्यास त्यांनी लोकांना सांगितले
Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.
0 comments:
Post a Comment