अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात
आला आहे.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी ४० किलो वजनाची
चांदीची शिळा राममंदिरासाठी अर्पण करणार.
नवी दिल्ली : २२ जुलै - अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
यावेळी त्यांच्याहस्ते ४० किलो चांदीची शिळा अर्पण केली जाणार आहे.
श्रीरामजन्मभभूमी तीर्थक्षेत्र
विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे मणिरामदास शिबिराच्या वतीने ही
शिळा पंतप्रधानांच्या हस्ते श्रीरामांना समर्पित करणार आहेत. महंत नृत्यगोपाल दास
यांनी याबाबतची माहिती दिली. मणिरामदास स्वामी सेवा मंडळ नेहमी धार्मिक सांस्कृतिक
परंपरा जपण्याचे काम करीत असते. संतांची सेवा, गोसेवा आणि निराधार
विद्यार्थ्यांचे संगोपन अशी अनेक कामे या मंडळातर्फे केली जातात.
Prime Minister Narendra Modi will offer a 40 kg silver stone for the Ram Temple.
१९८९ मध्ये काही रामभक्तांनी एक
शिळा आणि सव्वा रुपयाचे दान मंदिरासाठी दिले होते. अनेकांनी आपल्या इच्छेनुसार
शक्य असेल तेवढा निधी दिला आहे. मी न्यासाचा अध्यक्ष राहिलो आहे. सध्या मी
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र मंडळाचाही अध्यक्ष आहे, त्यामुळे या महायज्ञात
आपल्यावतीने समर्पण करण्याची जबाबदारी आम्ही या शिळेच्या स्वरूपात पार पाडत आहोत, असे त्यांनी सांगितले.
अयोध्येतील राममंदिराच्या
भूमिपूजनासाठी ५ ऑगस्टचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या सोहळ्यात
पंतप्रधानांनी उपस्थित राहावे, ही आमची विनंती त्यांनी मान्य केली आहे.
0 comments:
Post a Comment