सुर्यपुत्र भय्यासाहेब उर्फ़ यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाचा प्रवास कसा होता? -लेखक : प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर How to the journey of Yashwant Ambedkar's life? -Author: Prakash and Balasaheb Ambedkar

What was the journey of Yashwant Ambedkar's life like?

( प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा एकुलता एक सुपुत्र सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या उपेक्षित जीवनाचा आलेख आणि त्यांचे कतृत्वाचा परिचय करुन देणारा, अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी शब्दबध्द केलेला लेख नक्कीच वाचा)
 
  How is the journey of Yashwant Ambedkar's life? -Author: Prakash and Balasaheb Ambedkar  सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या उपेक्षित जीवनाचा आलेख
यशवंत भीमराव आंबेडकर

एक दडपलेला इतिहास 



 महापुरुषाचा मुलगा होणे ही जशी आनंदनीय बाब असते तेवढीच ती कठीणही असते. महापुरुषाच्या घरात जन्म झाला म्हणजे सामान्य जीवन जगणे समाप्त होते. तुम्ही अमुकाचे अमुक आहात अन् तरीही असे का वागता असे ज्याला कळते वा न कळते त्या सगळ्यांकडून ऐकून घ्यावे लागते. त्यांना उत्तर दिले तर तो उध्दटपणा ठरतो. अशाच दुर्बिणीखालील भय्यासाहेबांचे आयुष्य गेले.
 लहानपणीच न्यूमॅनिटीक आणि पायाच्या पोलिओ सारख्या आजाराने ग्रासलेल्या भैय्यासाहेबांना त्यांचे मामा धोत्रे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार केले. समुद्राच्या तप्त वाळूमध्ये पाय गाडून उभे राहणे आणि त्यातून पायात ऊर्जा निर्माण करणे हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम असे. त्याच बरोबर गावठी औषधाच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांना व्यवस्थित चालता बोलता यावे म्हणून विविध प्रकारचे खेळ ही खेळविण्यात येत होते.
 एका बाजूला भय्यासाहेब आजाराशी मुकाबला करीत होते, त्याचवेळी बाबासाहेबांची चळवळ उभारी घेत होती. काही निर्णय प्रश्नासंबंधी अत्युच्च टोकाला पोहोचत होती. अवघे वातावरण आंबेडकमय झालेले असायचे. याच दरम्यान भय्यासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेला बसले. परंतु ते कधीच उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. ते मॅट्रिक का पास होऊ शकले नाहीत याकडे कोणीच लक्ष दिले नाही. एका विद्वानाचा मुलगा मॅट्रिक पास होऊ शकत नाही हा ठपका घेऊन भय्यासाहेबांना आयुष्यभर जगावे लागले. जी गोष्ट भय्यासाहेबांची तशीच मुकुंदराव आंबेडकरांची सुद्धा. मुकुंदरावही मॅट्रिक पास होऊ शकत नाहीत. ज्या काळात एक आंबेडकर भारतीय समाज व्यवस्थेला पेलता आले नाही, त्याच्याशी दोन हात करताना पळता भुई थोडी व्हायची, त्या काळात आणखी दोन आंबेडकर कसे काय पेलवणार ? आणि म्हणूनच त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ दिले नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, राऊंड टेबल कॉन्फरन्स, गांधीजींचे उपोषण या निर्णायक काळात भय्यासाहेब व मुकुंदराव पुन्हा पुन्हा परीक्षेला बसत होते, परंतु त्या दोघांनाही ती परीक्षा उत्तीर्ण होऊ दिली नाही. या अपयशाची कधी कोणी मुल्यमापन केले आहे का ? दोघांनीही पुढे जे लिखाण केले, जी भाषणे केली, चळवळी केल्या त्याचा मागोवा घेतल्यास मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणे इतपत निर्बुद्ध होते असे कोण म्हणेल ?  व्यवस्थेने त्यांच्या माथी मॅट्रिक नापासाचा ठपका मारला व नंतरच्या काळात ते पदवीधर नाहीत म्हणून समाजातील म्होरक्यांकडून सतत अवेहलना स्वीकारावी लागली. भय्यासाहेबांना देण्यात येत असलेल्या मनस्तापाचा कधीही आणि कोणीही साकल्याने विचार केला नाही. त्यामुळे भय्यासाहेब हे सतत दडपणाखाली जगले आणि तरीही ते जे काही राजकीय व सार्वजनिक आयुष्य जगले त्याचे ते स्वतः शिल्पकार होते. भोवतालची परिस्थिती त्यांना अगतिक करू पाहत होती पण तरीही ते विजयी मुद्रेने जगले. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना लाभलेली कमालीची विल पाॅवर. या इच्छाशक्तीच्या बळावर त्यानी भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुनिन्सिपल कामगार संघ, पंचायत समिती, महाराष्ट्र विधिमंडळ आणि त्या काळचे राजकारण यावर त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला.
 बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापन, पक्षाचे मुखपत्र आणि धम्मयान सारखे धार्मिक नियतकालिक ही त्यांच्या इच्छाशक्तीची जितीजागती उदाहरणे आहेत.


प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा एकुलता एक सुपुत्र सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या उपेक्षित जीवनाचा आलेख आणि त्यांचे कर्तृत्वाचा परिचय करुन देणारा, अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी शब्दबध्द केलेला लेख नक्कीच वाचा*)

एक दडपलेला इतिहास 




(भाग दुसरा)


भय्यासाहेबांनी स्वतःचे आयुष्य स्वतः घडविले. त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. या कारखान्यात ते 25 टक्के भागीदार होते. परंतु या कारखान्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्याकडे तक्रार केली. बाप बेट्यांचे मतभेद व्हावेत ही दुष्ट अभिलाषा होतीच. ती त्यांची पूर्ण झाली आणि बाबासाहेब भय्यासाहेबांवर खप्पा झाले. शेवटी तो कारखाना मोडकळीस निघाला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला. त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीत पणे चालला. भय्यासाहेब स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत हे कार्यकर्त्यांना सहन झाले नाही. भय्यासाहेब हे सतत लंगडत असावेत व आपली काठी सांभाळावी. अशी अपेक्षा बाळगणाऱ्या लोकांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांकडे कांगाळ्या सुरू केल्या. काही अफवा पसरविल्या. दिल्लीला भय्यासाहेब काम करायला येत आहेत. तुमच्या पदाचा आणि नावाचा दुरुपयोग करणार आहेत. असे सांगण्यात आले. आपल्या पुत्राने स्वकर्तृत्वाने जीवन जगावे, कोणाचाही आधार घेऊ नये. माझ्या नावाचा सुद्धा, आणि म्हणूनच बाबासाहेबांनी भय्यासाहेबांना परत पाठविले. हात हलवीत. मतभेद नकोत. कांगाळ्या नकोत म्हणून भय्यासाहेबांनी तो उद्योग बंद केला.  पित्याचे कर्तव्य बाबासाहेब करीत नव्हते असे नव्हे. त्यांनी भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. तो छापखाना एका दंगलीमध्ये जाळण्यात आला. तो पुढे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस म्हणून आजच्या जागेत चालू आहे. ही जागा (गोकुळदास पास्ता लेन, दादर, पूर्व) बाबासाहेबांनी विकत घेतली. त्या जागेचा खाजगी ट्रस्ट केला. या जागेतला प्रेस भय्यासाहेबांना देण्यात आला. त्या दिवसापासून सर्व प्रकारची लायसन्स भय्यासाहेबांच्या नावावर होती. पुढे पक्षाची मुखपत्र चालवितांना संपादकीय मंडळाने प्रेस कोणाचा हा वाद उकरून काढला.
 त्याकाळी बाबासाहेबांनी अनेक संस्था सुरू केल्या. त्या संस्थांच्या नियामक मंडळावर भय्यासाहेब गेले नाहीत. त्या संस्थांनीही भय्यासाहेबांना विचारले नाही. व स्वाभिमानी भय्यासाहेबांनी त्या संस्थावर ट्रस्टी म्हणून जाण्याचा आग्रह कधी धरला नाही. ते आपले स्वतंत्र अस्तित्व सतत जपत राहिले. माझे वडील हे माझ्या एकट्याच नसून सर्व समाजाच्या आहेत हे भान त्यांनी ठेवले. हा खरेतर परोपकारी त्याग होता. हे एका तरी पुढाऱ्याला जमले असते का ? भय्यासाहेबांना ते जमले कारण एका स्वतंत्र बाण्याच्या महापुरुषाचे ते रक्त होते. त्यांच्या स्वतंत्र बाण्याचा आज आम्हाला अभिमान वाटत आहे. ते आम्ही आमचे भांडवल समजतो. आम्हाला समजायला लागल्यापासून आम्ही पाहत होतो ते सतत प्रवासात असणारे भय्यासाहेब.
 काही वर्ष एकत्रित कुटुंबात राहिल्यामुळे फारशी चणचण भासली नाही. परंतु पुढे पुढे ती जाणवायला लागली. आमच्या शिक्षणाची त्यांनी योग्य काळजी घेतली. माझ्या शाळेतल्या प्रिन्सिपल, वर्ग शिक्षकाला ते अधूनमधून भेटत असत. पालकदिनी ते स्वतः हजर राहत. व्यवस्थेने त्यांना मॅट्रिक होऊ दिले नाही. परंतु व्यवस्थेवर सूड उगविण्यासाठी त्यांनी आमच्या शिक्षणाची काळजी घेतली. स्वतः गणिते सोडवली. परिणामतः आम्ही सगळी भावंडे पदवीधर झालो. माझी शाळा समाप्त होण्याच्या दरम्यान त्यांचा आजार बळावला.न्युमॅनिटीकच्या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांनीच काही प्रमाणात मद्य घ्यायचा सल्ला दिला. मी त्यांना कधीही डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याच्या बाहेर मद्य प्यायलेलं पाहिले नाही. माझ्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता तो भय्यासाहेबांच्या मद्य प्राशनाचा एवढा बाऊ का करण्यात आला ? शारीरिक परिस्थिती सगळ्यांच्या लक्षात आल्यावरही जेंव्हा एखाद्या दूर्गुणाचा बाऊ करण्यात येतो तेंव्हा त्याला राजकारणाचा वास येऊ लागतो. अलीकडे हे माझ्या लक्षात येऊ लागले आहे. भय्यासाहेबांना वाढू दिले असते तर मग आपले काय ? या विवंचनेत असणाऱ्या लोकांनी भय्यासाहेबांना बदनाम करून त्या बदनामीच्या होळीवर स्वतःची पोळी भाजली. आयुष्याच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर नवी बदनामी त्यांच्या नावाला चिटकलेली दिसते. ज्यांनी बाबासाहेबांच्या जिवंतपणी भय्यासाहेबांची बदनामी केली त्यांना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तर रानच मोकळे मिळाले आणि भय्यासाहेबांची बदनामी करणे हा एककलमी कार्यक्रम राबवू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले पोलादी समाज संघटना कमकुवत होऊ नये म्हणून भय्यासाहेब नेहमीच जागरूक राहीले. रिपब्लिकन पक्षात अनेक गटाधिपती होते. भय्यासाहेबांना ही एखाद्या गटाचा नेता होता आले असते. परंतु आपल्या नावाने निर्माण झालेल्या गटापेक्षा आपल्या पित्याच्या कर्तृत्वाने निर्माण झालेल्या संघटनेला त्यांनी महत्व दिले, व जे गट निर्माण करीत होते त्यांना एकत्रित करीत राहिले. खरेतर भय्यासाहेबांनी स्वतंत्र पाऊल उचलले असते तर रिपब्लिकन पक्षाचा इतिहास काही वेगळाच झाला असता. कदाचित तमाम जनता बाबासाहेबाप्रमाणे भय्यासाहेबांबरोबर सुद्धा आली असती. परंतु जिल्हा वादातून निर्माण झालेले गट शाबूत राहिले असते. भय्यासाहेबांना हे नको होते. आपल्या वडिलांनी महत्प्रयासाने बांधलेल्या संघटनेला तडा नको म्हणून आयुष्यभर ऐक्यासाठी झटणाऱ्या भय्यासाहेबांना जेंव्हा कळून चुकले की, जनता जिल्हा आणि पोटजात विसरायला तयार नाही, तेंव्हा अगदी नाईलाजाने त्यांनी स्वतंत्र पाऊल उचलायचे ठरविले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आणि जनता वेगवेगळ्या गटात विसावली होती.

(भाग तिसरापुढे चालु....)

(प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा एकुलता एक सुपुत्र सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या उपेक्षित जीवनाचा आलेख आणि त्यांचे कर्तृत्वाचा परिचय करुन देणारा, अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी शब्दबध्द केलेला लेख नक्कीच वाचा)

एक दडपलेला इतिहास 


आपल्यामुळे आंबेडकरी संघटन दुभंगले, पंगू झाले. हा ठपका येऊ नये म्हणून भय्यासाहेब जागृत राहिले. तरी मोक्याच्या वेळी त्यांनी आपली हुकमी एक्याचा वापर केलेला दिसतो. उदाहरणात 1974 नंतरच्या ऐक्य प्रक्रियेनंतर बंगलोर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी गवईचा राजीनामा स्वतःकडे घेतला. राज्यकर्त्या काँग्रेस पक्षाने दिलेल्या तकलादू पदापेक्षा बाबासाहेबांची पोलादी संघटना महत्त्वाची हे ठरल्यानंतर गवई यांनी सत्ता स्थानाचा राजीनामा देणारे हे पत्र भय्यासाहेबांनी घेतले खरे परंतु तो सगळा आभास होता. पक्ष पुन्हा एकदा फुटला. गवईची सत्ता स्थाने शाबूत राहिली. बिचारे भय्यासाहेब! भय्यासाहेबांचा राग अनावर झाला आणि अखेर त्यांनी गवईच्या राजीनामा पत्राच्या चिंध्या चिंध्या केल्या. भय्यासाहेबांनी संघटनेला प्राधान्य आणि सत्तेला दुय्यम स्थान दिले होते. काही रिपब्लिकन नेत्यांची संघटनेला राज्यकर्त्या पक्षाची बटीक करून सत्ता उपभोगली तर सत्तेसाठी संघटनेला लाथ मारली. भय्यासाहेबांनी या दोन्ही पैकी काहीच केले नाही. त्यांना पद दिले जाईल एवढा मनाचा मोठेपणा रिपब्लिकन नेत्यांत नव्हता, आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची नियुक्ती हे काही रिपब्लिकन पक्षाचे कर्तृत्व नाही. या नियुक्तीचे श्रेय जाते ते संयुक्त महाराष्ट्र समितीकडे. समितीकडे भय्यासाहेबांच्या नावाचा आग्रह धरला. त्यातून तत्कालीन रिपब्लिकन नेत्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेता येतो. रिपब्लिकन नेतृत्वाने भय्यासाहेबांचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला. भय्यासाहेबांना वापरून घेणे यापलिकडे या नेतृत्वाचा दुसरा कोणताही हेतू नव्हता. हा उद्देश नसता तर नंतरच्या राज्यसभेच्या एका निवडणुकीत एका रिपब्लिकन नेत्यांनी त्या काळी लाखो रुपये खर्च केले व भय्यासाहेबांना एका मताने पाडले, हे आता गुलदस्त्यात राहिले नाही.
 बाबासाहेबांवर जनतेची आघात श्रध्दा होती व आजही आहे. अन् तरीही चैत्यभूमीच्या नावाने उभारण्यात येणारे स्मारक पूर्ण होत नव्हते. निधी पाहिजे त्या प्रमाणात जमत नव्हता. लोकांची मानसिकता आजही बदललेली नाही. आज आर्थिक अवस्था बदलली आहे. परंतु देण्याची प्रवृत्ती वाढीला लागली नाही. सामान्य माणूस खिसा खाली करतो. परंतु आर्थिक स्थैर्याचा लाभ उठविणारे आपला खिसा भरेल कसा हेच पहात असतात. बाबासाहेबांच्या नावाने वेगवेगळ्या स्वरूपात फायदा घेणारे लोक चैत्यभूमी साठी भय्यासाहेबांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नव्हते आणि म्हणून भय्यासाहेबांनी हा निधी गोळा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यासाठी त्यांनी महुपासून भिमज्योत काढली. मध्यप्रदेशातून नागपूर, पुणे मार्गे मुंबईला आणली. या प्रवासात चैत्यभूमी साठी निधी मिळाला. माझ्या आठवणीप्रमाणे या पिशव्या नाण्यांच्या असायच्या. काही लोकांनी जास्त रक्कम देण्या ऐवजी हजारो लोकांनी दिलेल्या अल्प मदतीतून, म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मदतीने हा निधी उभा राहिला. चैत्यभूमीच्या बांधकामासाठी नेत्यांच्या आवाहनानुसार स्टेट बँकेत लोकांनी रांगा लावून पैसे भरले होते. रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीमुळे, हे पैसे चैत्यभूमीसाठी देण्यात आले असते तर भैय्यासाहेबांना महु ते मुंबई हा भीमज्योतीसह प्रवास करावा लागला नसता. आजही या निधीचे काय झाले, समाजातील म्होरके निधी संकलकांना विचारीत नाहीत. मग मी तरी कशाला विचारू ? निधी संकलन आजही जिवंत आहेत, आणि स्टेट बँकेने व्याज देणे बंद केले आहे. समाजाचे लाखो रुपये कुजविले जात आहेत. याबद्दल कधीही कुणाला तरी जाणीव होईल यावर माझा विश्वास आहे. पण निधी संकलन जिवंत असेपर्यंत ही जाणीव झाली नाही तर पुढे दगडावर डोके आपटल्यासारखे होईल. जी परिस्थिती स्टेट बँकेच्या पैशाची तीचपरिस्थिती गाव कामगार कनिष्ठ सभेची. हायकोर्टाच्या एका निर्णयानुसार फोर्टमधील स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेतून 36 हजार रुपये उपशाम यांच्याकडे देण्यात आले. त्या पैशांचे काय झाले हे एकाही पुढाऱ्यांने त्यांना विचारले नाही. याचे कारण त्याने बाबासाहेबांच्या संस्था वाटून घेतल्या होत्या. कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ताबा घेतला. कोणी इंप्रुव्हमेंट ट्रस्टचा तर कोणी गावकामगार सारख्या इतर संस्थांचा. भय्यासाहेबांना या कोणत्याही संस्थेत प्रवेश नव्हता. त्यामुळे त्या संस्थांमध्ये आर्थिक गडबडी होत असल्या तरी तेरी भी चूप, मेरी भी चुप या न्यायाने खाणाऱ्यांना मुक्तद्वार ठेवण्यात आले. बाबासाहेबांनी कणाकणाने पैसा गोळा केला. संस्था उभ्या केल्या. त्या नावारूपाला आणल्या. परंतु त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र त्या मनमुराद लुटल्या. आज या संस्थांची जी अवस्था आहे तिला संस्थेचे पदाधिकारी जबाबदार नाहीत असे कोण म्हणेल ? या संस्थेमध्ये भय्यासाहेबांना घेण्यात आले असते तर काही प्रमाणात वचक बसला असता. वरळीच्या आर. एन. चव्हाण मास्तरांनी उपोषणाची धमकी दिली नसती आणि वराळे संस्थेमध्ये नसते तर भय्यासाहेबांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीत वर्णी लागली नसती. वर्णी लागली तेंव्हा लूटमार झालेली होती. भय्यासाहेबांच्या प्रवेशानंतर ती काही काळ थांबली.


आपल्यामुळे आंबेडकरी संघटन दुभंगले, पंगू झाले. हा ठपका येऊ नये म्हणून भय्यासाहेब जागृत राहिले. तरी मोक्याच्या वेळी त्यांनी आपली हुकमी एक्याचा वापर केलेला दिसतो. उदाहरणात 1974 नंतरच्या ऐक्य प्रक्रियेनंतर बंगलोर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी गवईचा राजीनामा स्वतःकडे घेतला. राज्यकर्त्या काँग्रेस पक्षाने दिलेल्या तकलादू पदापेक्षा बाबासाहेबांची पोलादी संघटना महत्त्वाची हे ठरल्यानंतर गवई यांनी सत्ता स्थानाचा राजीनामा देणारे हे पत्र भय्यासाहेबांनी घेतले खरे परंतु तो सगळा आभास होता. पक्ष पुन्हा एकदा फुटला. गवईची सत्ता स्थाने शाबूत राहिली. बिचारे भय्यासाहेब! भय्यासाहेबांचा राग अनावर झाला आणि अखेर त्यांनी गवईच्या राजीनामा पत्राच्या चिंध्या चिंध्या केल्या. भय्यासाहेबांनी संघटनेला प्राधान्य आणि सत्तेला दुय्यम स्थान दिले होते. काही रिपब्लिकन नेत्यांची संघटनेला राज्यकर्त्या पक्षाची बटीक करून सत्ता उपभोगली तर सत्तेसाठी संघटनेला लाथ मारली. भय्यासाहेबांनी या दोन्ही पैकी काहीच केले नाही. त्यांना पद दिले जाईल एवढा मनाचा मोठेपणा रिपब्लिकन नेत्यांत नव्हता, आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची नियुक्ती हे काही रिपब्लिकन पक्षाचे कर्तृत्व नाही. या नियुक्तीचे श्रेय जाते ते संयुक्त महाराष्ट्र समितीकडे. समितीकडे भय्यासाहेबांच्या नावाचा आग्रह धरला. त्यातून तत्कालीन रिपब्लिकन नेत्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेता येतो. रिपब्लिकन नेतृत्वाने भय्यासाहेबांचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला. भय्यासाहेबांना वापरून घेणे यापलिकडे या नेतृत्वाचा दुसरा कोणताही हेतू नव्हता. हा उद्देश नसता तर नंतरच्या राज्यसभेच्या एका निवडणुकीत एका रिपब्लिकन नेत्यांनी त्या काळी लाखो रुपये खर्च केले व भय्यासाहेबांना एका मताने पाडले, हे आता गुलदस्त्यात राहिले नाही.
 बाबासाहेबांवर जनतेची आघात श्रध्दा होती व आजही आहे. अन् तरीही चैत्यभूमीच्या नावाने उभारण्यात येणारे स्मारक पूर्ण होत नव्हते. निधी पाहिजे त्या प्रमाणात जमत नव्हता. लोकांची मानसिकता आजही बदललेली नाही. आज आर्थिक अवस्था बदलली आहे. परंतु देण्याची प्रवृत्ती वाढीला लागली नाही. सामान्य माणूस खिसा खाली करतो. परंतु आर्थिक स्थैर्याचा लाभ उठविणारे आपला खिसा भरेल कसा हेच पहात असतात. बाबासाहेबांच्या नावाने वेगवेगळ्या स्वरूपात फायदा घेणारे लोक चैत्यभूमी साठी भय्यासाहेबांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नव्हते आणि म्हणून भय्यासाहेबांनी हा निधी गोळा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यासाठी त्यांनी महुपासून भिमज्योत काढली. मध्यप्रदेशातून नागपूर, पुणे मार्गे मुंबईला आणली. या प्रवासात चैत्यभूमी साठी निधी मिळाला. माझ्या आठवणीप्रमाणे या पिशव्या नाण्यांच्या असायच्या. काही लोकांनी जास्त रक्कम देण्या ऐवजी हजारो लोकांनी दिलेल्या अल्प मदतीतून, म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या मदतीने हा निधी उभा राहिला. चैत्यभूमीच्या बांधकामासाठी नेत्यांच्या आवाहनानुसार स्टेट बँकेत लोकांनी रांगा लावून पैसे भरले होते. रिपब्लिकन पक्षाच्या गटबाजीमुळे, हे पैसे चैत्यभूमीसाठी देण्यात आले असते तर भैय्यासाहेबांना महु ते मुंबई हा भीमज्योतीसह प्रवास करावा लागला नसता. आजही या निधीचे काय झाले, समाजातील म्होरके निधी संकलकांना विचारीत नाहीत. मग मी तरी कशाला विचारू ? निधी संकलन आजही जिवंत आहेत, आणि स्टेट बँकेने व्याज देणे बंद केले आहे. समाजाचे लाखो रुपये कुजविले जात आहेत. याबद्दल कधीही कुणाला तरी जाणीव होईल यावर माझा विश्वास आहे. पण निधी संकलन जिवंत असेपर्यंत ही जाणीव झाली नाही तर पुढे दगडावर डोके आपटल्यासारखे होईल. जी परिस्थिती स्टेट बँकेच्या पैशाची तीचपरिस्थिती गाव कामगार कनिष्ठ सभेची. हायकोर्टाच्या एका निर्णयानुसार फोर्टमधील स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेतून 36 हजार रुपये उपशाम यांच्याकडे देण्यात आले. त्या पैशांचे काय झाले हे एकाही पुढाऱ्यांने त्यांना विचारले नाही. याचे कारण त्याने बाबासाहेबांच्या संस्था वाटून घेतल्या होत्या. कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ताबा घेतला. कोणी इंप्रुव्हमेंट ट्रस्टचा तर कोणी गावकामगार सारख्या इतर संस्थांचा. भय्यासाहेबांना या कोणत्याही संस्थेत प्रवेश नव्हता. त्यामुळे त्या संस्थांमध्ये आर्थिक गडबडी होत असल्या तरी तेरी भी चूप, मेरी भी चुप या न्यायाने खाणाऱ्यांना मुक्तद्वार ठेवण्यात आले. बाबासाहेबांनी कणाकणाने पैसा गोळा केला. संस्था उभ्या केल्या. त्या नावारूपाला आणल्या. परंतु त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र त्या मनमुराद लुटल्या. आज या संस्थांची जी अवस्था आहे तिला संस्थेचे पदाधिकारी जबाबदार नाहीत असे कोण म्हणेल ? या संस्थेमध्ये भय्यासाहेबांना घेण्यात आले असते तर काही प्रमाणात वचक बसला असता. वरळीच्या आर. एन. चव्हाण मास्तरांनी उपोषणाची धमकी दिली नसती आणि वराळे संस्थेमध्ये नसते तर भय्यासाहेबांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीत वर्णी लागली नसती. वर्णी लागली 
तेंव्हा लूटमार झालेली होती. भय्यासाहेबांच्या प्रवेशानंतर ती काही काळ थांबली.

(भागशेवटचा)



प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला. कोर्टाच्या नियमाप्रमाणे तीन लाख साठ हजार रुपये राजगृहाची किंमत ठरली. माईसाहेब 50 टक्के हिस्सेदार ठरल्या. या राजगृहात माईसाहेब राहायला जाणार असतील तर त्यांनी भय्यासाहेबांना एक लाख ऐंशी हजार रुपये द्यावे व माईसाहेब जाणार नसतील तर त्यांना भय्यासाहेबांनी एक लाख ऐंशी हजार द्यावेत.
 खारचे घर एकत्रित कुटुंबाचे होते म्हणून राजगृहात राहायचे भय्यासाहेबांनी ठरविले. त्यांनी दीड लाखाची तरतूद केली. परंतु 30 हजार कमी पडले. माईंना तर एकरक्कमी पैसे हवे होते.
 भय्यासाहेबांनी नाईलाजाने 30 हजार रुपये पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे कर्जरूपाने मागितले. व्याजासहित ते लवकरच परत करेन असा लेखी अर्ज दिला. परंतु भय्यासाहेबांचा अर्ज निकालात काढला. त्यांना कर्ज नाकारले. मात्र त्याच वेळी संस्थेने अनेक बड्या मंडळींना कर्जवाटप केले. आपल्याला नकार आणि इतरांना होकार हे भय्यासाहेबांना कळले तेव्हा त्यांना काय वाटले असेल ? 
भय्यासाहेबांनी तेही दुःख गिळले व इतर मार्गाने 30 हजार रुपये गोळा करून माईंना दिले, व आजचे राजगृह विकत घेतले. राजगृह त्याकाळी हॉस्टेल झाले असल्यामुळे बाबासाहेबांचे अतिमहत्‍वाचे सामान जयराजभवन वरून पीपल्स एज्युकेशन सोसायटी कडे देण्यात आले. त्या सामानाचे काय झाले हे कधीच कळले नाही. माझ्या समजुतीप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर दोनच व्यक्ती देऊ शकतील, एन.एम. कांबळे व दुसरे घनश्याम तळवटकर.
 मी राजगृहामध्ये 1968 साली आलो. त्या आधी मी आजी-आजोबांकडे राहत होतो. परंतु अधूनमधून मी राजगृहामध्ये येत असे व कापर्डेकर व मिलिटरी रिटायर्ड कांबळे यांची भेट घेत असे.
 माईसाहेबांना एक लाख ऐंशी हजार रुपये देऊन सुद्धा 1966 पर्यंत भय्यासाहेब राजगृहावर येऊ शकले नाहीत.
 1964 साली वडाळ्याचे वसतीगृह सुरु झाल्यानंतर राजगृहातले विद्यार्थी सिद्धार्थ विहारमध्ये गेले.
1964 साली वडाळा हाॅस्टेल झाल्यानंतरही सोसायटीकडे अनेक अर्ज विनंती कराव्या लागल्या. अखेर तिसर्‍या माळ्यावरील एक फ्लॅट भय्यासाहेबांना देण्यात आला. या दरम्यान भय्यासाहेबांचा पायाचा आजार बळावला. त्यांना तिसर्‍या माळ्यावर जिने चढणे मुश्किल होऊ लागले आणि म्हणून पुन्हा एकदा अर्ज करावा लागला. सोसायटीने दुसरा माळा द्यावा अशी विनंती भय्यासाहेबांनी केली होती. परंतु त्या अर्जावर निर्णय घेण्यास सोसायटीला  5-6 वर्ष लागली. भय्यासाहेबांच्या आजाराची कल्पना सोसायटीच्या लोकांना नव्हती असे नाही. शिवाय त्या जागेसाठी भय्यासाहेबांनी पैसे मोजले होते. हॉस्टेल झाल्यामुळे भय्यासाहेब हतबल झाले होते व सोसायटीच्या लोकांनी तर छळवाद मांडला होता. या छळवादाला काय म्हणावे ?
 समाजातल्या म्होरक्यांनी भय्यासाहेबांची कोंडी केली असली तरी सामान्य माणूस मात्र भय्यासाहेबांवरून प्राण ओवाळून टाकायला तयार होता. त्यांचे सहकारी अखेरच्या काळात त्यांना सोडून गेले.
धर्मांतरीत बौद्धांचा हक्काची समस्या 1960 पासून अनुत्तरीत होती. बौद्धांच्या सवलती साठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला व आयुष्याच्या संध्याकाळी ह्या एकाच प्रश्नावर लोकसभेची निवडणूक लढविली राजा ढाले, ज.वि. पवार यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. परंतु भय्यासाहेबांसमोर "तुम्हालाच मते" म्हणणार्‍या लोकांनी स्वार्थाला बळी पडून विरोधकांना मते दिली.
 एका समस्येसाठी निवडणूक लढवणाऱ्या भय्यासाहेबांनी हाही कडू घोट गिळाला.
 भैय्यासाहेबांच्या निर्वाणानंतर एक राजकीय पोकळी निर्माण झाली. आंबेडकरी समाजाचे नेतृत्व ज्यांच्याकडे Political vision नाही त्यांच्याकडे राहिले. आजही ती अवस्था आहे. ही उणीव कधीतरी भरून निघेल का ? हा माझ्या समोरील मोठा प्रश्न आहे. मी त्याच बरोबर एवढेच म्हणतो की, राजकीय लीडरशिप नसली तरी चालेल, परंतु व्यक्तिगत जाणिवेने प्रेरित होऊन समूहांमध्ये क्रांती घडविणे महत्त्वाचे असते. इतिहासच निर्वाळा देईल की, आंबेडकरी समाज हा केवळ सत्तेभोवती घुटमळला की बाबासाहेबांनी दाखविलेल्या क्रांतिकारक मार्गाने गेला ?  नेत्यांमध्ये Political vision नसल्यामुळे मला ही चिंतनीय बाब वाटत आहे.


(लेखक : प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर)


SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment