नागरीकांनी सोमवार
मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस स्वयंसपूर्तीने जनता कर्फ्यु पाळावा असे सर्व
पक्षीयांनी केले आहे.
Like other cities, Shegaon Corona is on its way to becoming a hotspot.
ब्रेकिंग-
शेगांवात तीन दिवस जनता कर्फ्यु
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहभागी
व्हावे.
सर्व पक्षीयांचा निर्णय.
![]() |
शेगांव कोरोना |
Like other cities, Shegaon Corona is on its way to becoming a hotspot.
- शेगांव शहरात कोरोनाचा धोका वाढत असून दररोज नवनवीन रुग्णआढळून येत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब
असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी
नागरिकांनी तीन दिवस जनता कर्फ्यु पाळावा असे, आवाहन शेगांवकरांनी केले आहे.
इतर शहरांप्रमाणे
शेगांव कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्या खप
मोठी झाली आहे. गत काही दिवसापासून शहरात दररोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
यामुळे कोरोनाचा धोका अधीक वाढत आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास परिस्थिती हाता
बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे
अत्यावश्यक झाले आहे. तरी शहरातील सर्व व्यापारी, व्यवसायिक, तसेच नागरीकांनी
सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस स्वयंसपूर्तीने जनता कर्फ्यु पाळावा असे
सर्व पक्षीयांनी केले आहे. या काळात नागरीकांनी स्वतःची व परिवाराची सुरक्षा
लक्षात घेता घरातच राहावे. अत्यावश्यक काम नसल्यास घरा बाहेर पडू नये सर्वांनी
जबाबदारी म्हणून हा जनता कर्फ्यु पाळल्यास आपण नक्कीच कोरोना हरवू शकतो असा
विश्वास शेगांवकरांना आहे.
( या काळात फक्त
अत्यावश्यक सेवाच काही विहित काळासाठी सुरु राहतील असे ठरविण्यात आले असल्याचे
समजते .)
एसबीआय कॉलोनीत सापडला कोरोना बाधित
शहरातील एसबीआय कॉलोनी मध्ये राहणारा ३० वर्षे वयाचा युवक आज
कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
बुलढाणा कोरोना अपडेट
आज पुन्हा 32 नवे कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात
कोरोनाबाधितांची संख्या 445 वर
बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळी नवे 32 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सर्वाधिक
खामगाव 14 तर मेहकर 7, शेगाव 3, मलकापूर 5 आणि नांदुरा 3 असा समावेश आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 203 झाली असून आतापर्यंत 445 जण संसर्गित झालेले आहे.
0 comments:
Post a Comment