तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूत 1०० टक्के सहभागी
झाल्याबददल आमदार ॲड.आकाश फुंडकरांनी मानले जनतेचे आभार.
खामगांवात पुन्हा तीन दिवसाचा जनता कर्फ्यू
तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूत 1०० टक्के सहभागी झाल्याबददल आमदार ॲड.आकाश फुंडकरांनी मानले जनतेचे आभार
कोरोनाला हददपार करण्यासाठी सोमवार, मंगळवार व बुधवार तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन
खामगाव मध्ये मागील तीन दिवसापासून जनता कर्फ्यू सुरू आहे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा “जनता कर्फ्यू” यशस्वी केला आहे त्याबद्दल खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी तमाम खामगावकर जनतेचे आभार मानले आहे. परंतु कोरोना महामारीचे संकट मागील काही दिवसापासून अधिकच गडद झाले आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा आपल्याला थोडा संयम दाखवत “जनता कर्फ्यू”त सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे आता येत्या तीन दिवस म्हणजे दिनांक 13, 14 व 15 जुलै आपण सर्व या “जनता कर्फ्यू”मध्ये सहभागी व्हावे व पुन्हा 100% यात सहभागी होऊन आपल्याला कोरोनाला मात द्यायची आहे हा निश्चय करायचा आहे असे आवाहन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.
खामगाव मतदार
संघाचे आमदार यांनी कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दिनांक 9 जुलै रोजी खामगावात जनता कर्फ्यूचे आवाहन केले
होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खामगावकर जनतेने 100% खामगाव बंद पाळला व जनता कर्फ्यू यशस्वी केला. परंतु ह्या
दरम्यान खामगाव मतदार संघात कोरोनाची संख्या अतिशय झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे
येत्या काळातील जनता कर्फ्यू वाढविण्यात यावा अशी मागणी समोर आली. अनेक सामाजिक
संघटना व्यापारी संघटना व्यापारी असोसिएशन यांनी आमदार आकाश फुंडकर यांना
केली. मागील तीन दिवसाच्या जनता कर्फ्यू
मुळे पॉझीटीव्ह आलेल्या कोरोना रुग्णांचे व त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर
व्यक्तींचे तात्काळ विलगीकरण करणे शक्य झाले आहे
त्या व्यक्तींपासून इतर लोकांमध्ये कोरोना संसंर्ग पसरण्यापासून बचाव झाला.
त्यामुळे आज आमदार आकाश फुंडकर यांनी नगर परिषद
खामगाव येथे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, खामगांव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री अंबुलकर, नगर
परिषद मुख्याधिकारी बोरीकर,डॉ निलेश टापरे निवासी वैद्यीकीय अधिक्षक, यांच्यासह प्रमुख अधिका-यांसोबत चर्चा करून खामगाव “जनता
कर्फ्यू” तीन
दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता दिनांक 13 14 व 15
जुलै म्हणजेच सोमवार, मंगळवार, व
बुधवार या तीन दिवस पुन्हा “जनता कर्फ्यू” चे आव्हान आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे. कोरोना
ही भयंकर महामारी असून या महामारी मुळे लाखो लोकांना गिळंकृत केले आहे.
अनेक नामांकित
व्यक्तींचा मृत्यू यामुळे झालेला आहे, जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला मात देण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाहणे हे
सर्वात चांगले हत्यार आहे. यासाठी “जनता कर्फ्यू”
चे आवाहन करण्यात आले असून जनता कर्फ्यू मुळे
मागील तीन दिवसात आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून जे आधीच्या कोरोना
संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आलेले लोक आहेत तेच पॉझिटिव निघालेले असून कोरोनाचा
नवीन प्रसार झाल्याचे आज आढळून आले नाही
त्यामुळे नवीन संसर्ग वाढीची शक्यता मावळली आहे, त्यासाठी येते तीन
दिवस जर आपण अजून कडकडीत बंद पाळून या “जनता कर्फ्यू” मध्ये सहभागी
झाल्यास आपलं खामगाव हे “कोरोना मुक्त”
होईल,
कोरोनावर पायबंद घालता
येईल.
Three-day public curfew in Khamgaon again
तमाम जनता
कोरोनावर मात देण्यासाठी एकत्र येत असतांना जिल्हयात एक कोरोना तपासणी लॅब
नसल्यामुळे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत.
कोरोनाचे स्वॅब खराब होऊन त्यांचा परिणाम रिपोर्टवर होत आहे. कोरोना लॅबची घोषणा झाल्याबददल पालकमंत्री
यांचे आभार ती खामगांवात नाही झाली तरी हरकत नाही पण बुलढाणा जिल्हयात होत आहे हे
आंनदाची बाब आहे. परंतु उपरोक्त लॅब ला
अद्याप पर्यंत प्रशासकीय मान्यता नाही त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक जेव्हा ती
लॅब सुरु करतील तेव्हाच आपण ते खर मानायच कारण त्यांच्याबददल खामगांवकर जनतेला
चांगला अनुभव नाही कारण 2० लाख रुपए मंजूर
असून देखील सरळ लॅब खरेदीची परवानगी असतांना जिल्हा शल्य चिकीत्सक व जिल्हा
प्रशासन हे ती खरेदी करण्यात हलगर्जीपणा व वेळ काढू पणा करीत आहेत. त्याचे दुष्परिणाम खामगांवकर जनता व बुलढाणा
जिल्हयातील नागरीकांना भोगावे लागत आहेत.
आमदार आकाश
फुंडकर पुढे म्हणाले की, आज जी परिस्थिती
निर्माण झाली आहे ते होणार हे ओळखूनच दि.०6 जून २०२० रोजी खामगांव येथे लॅब खरेदीसाठी रु २० लक्ष निधी
वर्ग करण्यात आला होता. आज जी रुग्ण
संख्या वाढत आहे हयाबददत दि. १ जुलै च्या पत्रकार परिषदेतच मी आपल्या सर्व पत्रकार
बांधवांना अशी परिस्थिती येईल हे भाकीत सांगितले होते. त्यांनतर आज १२ दिवस उलटूनही जिल्हा प्रशासन
हयाबददल कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मनात काय आहे हे सर्व सामान्य जनता समजलीच
असेल आणि खामगांवात लॅब होऊ नये हयामागे प्रशासनाचा हेतु काय हे अद्याप समजले
नाही. प्रशासनिक अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी असतात असे वाटते पण जिल्हा
प्रशासनाने जनतेच्या जिवाशी खेळ लावलाय, कारण आजही जिल्हयाचे स्वॅब तपासणीसाठी नागपूर, पुणे येथे जात असल्याचे समजतेय.
लॅब खरेदीला
अक्षम्य दिरंगाई करणारे अधिका-यांना तमाम बुलढाणेकरांच्या प्रश्नांना उत्तर द्याव
लागणार आहे.
0 comments:
Post a Comment