पाकिस्तानमध्ये चीनने बनविले जैविक युद्धाचे केंद्र. China builds biological warfare center in Pakistan.

चीन पाकिस्तानमध्ये धोकादायक जीवाणू विषाणू आणि इतर जीवाणूंच्या संशोधनात मदत करणार आहे.

पाकिस्तानमध्ये चीनने बनविले जैविक युद्धाचे केंद्र.

बीजिंग, 25 जुलै : कोरोना विषाणूचे निर्मितीकेंद्र असलेल्या चीनने आता पाकिस्तानला जैविक युद्धाचे केंद्र बनविले आहे. यासाठी दोन्ही देशामध्ये गुप्त करार झाला असून याद्वारे चीन पाकिस्तानमध्ये धोकादायक जीवाणू विषाणू आणि इतर जीवाणूंच्या संशोधनात मदत करणार आहे. या करारासंदर्भातील एक अहवाल काही वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांच्या हातात लागला आहे. त्याद्वारेच यासंदर्भातील वृत्त देण्यात आले आहे.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि चीनने जैविक शस्त्रास्त्रांची क्षमता वाढविण्यासाठी तीन वर्षांचा गुप्त करार केला आहे. वुहान येथील प्रयोगशाळेने संसर्गजन्य रोगांवर जैविक नियंत्रणावरील संशोधनासाठी पाकिस्तानच्या विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेसोबत करार केला आहे. कोरोनाचा वाढात प्रादुर्भाव आणि विस्तारवादी धोरणामुळे चीन सध्या अनेक देशांच्या रोषाचे लक्ष्य ठरला आहे. यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी चीन अशा प्रकार्‍या कुरापती करीत असल्याचे अहवालात नमूद आहे. वुहान प्रयोगशाळेने पाकिस्तानला या प्रयोगासाठी आर्थिक आणि शास्त्रीय माहितीसह इतर साहित्य व आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली आहे.

SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment