धक्कदायक बाब म्हणजे जुम्मा याने आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर विच्छेदन करू दिले नाही.
हरियाणा, 26 जुलै: हरियाणातल्या जिंदमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मांत्रिकाच्याच
सांगण्यावरून नराधम पित्याने गेल्या पाच वर्षात आपल्या पोटच्या पाच मुलांची हत्या
केली. या प्रकरणी जिंद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका पित्यावरच आपल्या पाच
मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. अलीकडेच संशयित आरोपीची 11 वर्षाची मुस्कान नावाची मुलगी आणि 7 वर्षाची निशा
यांचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र त्यांची हत्या झाल्याच्या संशयावरून आणि
याआधी एका मुलीची आणि दोन मुलींची हत्या केल याच्या आरोपाखाली त्याला अटक केली
आहे. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून पित्यानेच आपल्या पाच मुलांची हत्या केल्याचे
बोलले जात आहे. जुम्मा असे या व्यक्तीचे नाव आहे. पाच वर्षात आपल्या पाच मुलांना
गमावल्याचे तो सांगत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर
दोन वर्षांनी एक मुलगी खेळताना मरण पावली. काही महिन्यानंतर एका मुलाला अचानक
उलट्या होऊ लागल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. दोषींना शिक्षा व्हायला हवी अशी
तो मागणी करत आहे. धक्कदायक बाब म्हणजे जुम्मा याने आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर
विच्छेदन करू दिले नाही. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित सिंह शेखावत यांनी सांगितले
की, मुले बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र,
त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर संशय बळावला आणि हत्येचा गुन्हा दाखल
करण्यात आला.
0 comments:
Post a Comment