लग्नाचे आमिष दाखवून दलित तरुणीवर चार वर्ष केले लैंगिक अत्याचार. Dalit girl sexually abused for four years on the pretext of marriage.

लैंगिक अत्याचारांमुळे पीडित २०१८ मध्ये तरुणी २ महिन्याची गर्भवती झाली. तरूणाने जबरदस्तीने गर्भपात गोळ्या देऊन तिला गर्भपात केल्याचा आरोप तरुणीने केला.
 शादी के बहाने दलित लड़की पर चार साल तक यौन शोषण किया


नागपूर : शहरातील वाडी परीसरातील एका दलित तरुणीना लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात अडकविल्याची तक्रार वाडी पोलिस स्टेशनमध्ये दि. २७ जूलै २० रोजी पिडीतीने दिले. परंतु पोलिसांनी पीडितीची तक्रार घेतली नाही त्यामुळे तरुणीने वाडी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले.वाडी पोलिस तक्रार का नोंदवित नाही आहे, पीडित तरूणीने पत्रपरिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे.
प्राप्त माहितीनुसार वाडीतील एका दलित तरुणीला एका तरुणाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविले होते. तरुणीने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. फेसबुक'वर भेट झाली असता दोघांचे संबंध प्रेम संबंधात रूपांतर झालेले. दोघांनीही एकमेकांना साथ देण्याचे आश्वासन दिले. 2016 मध्ये प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली.मुलाने लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर नेहमीच दुष्कर्म केला. तिच्या पूर्णपणे पत्नी सारखा उपयोग करून घेतला. विवाहाबद्दल तरुणी ने विचारण केली, तेव्हा तरूणीच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला खालच्या जातीचा आहे म्हणून नकार दिला.असे असूनही, तरुणाने पीडित तरूणीच्या सोबत दि. १२ एप्रील २० रोजी वनाडोंगरी येथे भाड्याच्या घरात पती-पत्नीसारखे लग्न न करता राहण्यास सुरवात केली.लैंगिक अत्याचारांमुळे पीडित २०१८ मध्ये तरुणी २ महिन्याची गर्भवती झाली. तरूणाने जबरदस्तीने गर्भपात गोळ्या देऊन तिला गर्भपात केल्याचा आरोप तरुणीने केला. तरूणाने लग्नाचे आमिष दिले आणि वारंवार तरुणीशी दुष्कर्म केले.चार वर्षे लोटल्यानंतरही लग्न न केल्याने तरुणीने तरुणाला लग्नासाठी उद्युक्त केले, परंतु तु खालच्या जातीची आहे व माझे काम झाले आहे,मी लग्न करत नाही अशे बोलून तरुणीला एकटी सोडले. दोघांचे प्रेमप्रकरण दोघांच्याही कुटुंबांना माहिती होते.लग्न न केल्याने तरूणी वाडी पोलिस ठाण्यात गेली पण वाडी पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. तर तरुणीने पोलीस आयुक्त व वाडी पोलीस स्टेशनला रजिस्टर तक्रार केली.असे असूनही, पीडित तरूणी न्यायासाठी विनवणी करत गेली.वाडी पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलविले परंतु दोघांना समजोता करण्याचा प्रयत्न केला.पीडितिला तारखेवर तारीख देण्यात आली पण गुरुवारपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. हे प्रकरण एपीआय ज्ञानेश्वर ढवळे यांच्याकडे आहे.ढवळे यांनी पीडितेला सोमवार,मंगलवाल, बुधवारी पोलिस ठाण्यात वारंवार बोलवून त्रास देत असल्याचा तसेच गुन्हा न नोंदवित असल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला.वाडी पोलिसांनी संबंधित तरुणावर बलात्कार, फसवणूक आणि अ‍ॅट्रॉसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली आहे.जर वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही तर पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा पीडितेच्या आईने दिला आहे.
SHARE

Asset Master

Hi. I’m Digital Marketing Expert. I’m Founder of Themindassets.com. I’m Creative Art Director, Web Designer, Web Developer, Facebook Marketing Expert, Spiritual Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment