कोरोना संसर्गविषयी भिकार्यांकडेच का बोट दाखवायचे? त्याच्यांवर
कोेणाचेही नियंत्रण नाही, म्हणून ते संसर्ग वाढवण्यासाठी
कारणीभूत ठरू शकतात, असे का म्हणायचे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त
मुंबई, 25 जुलै : कोरोना संसर्गविषयी भिकार्यांकडेच का बोट दाखवायचे? त्याच्यांवर कोेणाचेही नियंत्रण नाही, म्हणून ते
संसर्ग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, असे का म्हणायचे।
सुसंस्कृत समाजातील अनेक लोकही कोरोनाच्या संदर्भात वावर व अन्य नियमांचे पालन
करताना दिसत नाहीत, असे परखड शब्दात मुख्य न्यायमूर्ती
दीपांकर दत्ता यांनी व्यक्त केली.
लॉकडाऊन काळात बेरोजगार कुटुंबामधील लोक
रस्त्यांवर भीक मागू लागल्याने त्यांची संख्या वाढली आहे. अशा कुटुंबातील महिला व
लहानु मुले पुणे शहरातील रस्त्यांवर भीक मागत असल्याचे दिसत आहे. भिक्षा प्रतिबंधक
कायद्यान्वये भीक मागण्यास मनाई असतानाही पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होत नाही.
हे मोठे रॅकेट असून त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे सध्याच्या कोरोना संकटाच्या काळातही
सरकारचे यावर नियंत्रण नाही. सुरक्षित वावरायाच नियम, मास्क
इत्यादीची भिकार्यांना कल्पना नसल्याने त्याच्या अज्ञानामुळे कोरोनाचा संसर्ग
आणखी वाढण्याची भीती आहे, असे म्हणणे जनहित याचिकादार
ज्ञानेश्वर दारवटकर यांनी अॅड. शेखर जगतप यांच्यामार्फत केलेल्या तातडीच्या
अर्जाद्वारे मांडले होते.
0 comments:
Post a Comment