ट्रॅक्टर पळून जात असताना तलाठी कवाने यांंनी टॅक्टर पकडण्याचा प्रयत्न
केला असता एकाने सरळ ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरच घातला.
वाळू माफियांनी ट्रॅक्टर घातला तलाठ्याच्या
अंगावर.
यवतमाळ : २१ जुलै - यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी, येथील पैनगंगेच्या पात्रातून
मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. याची माहिती
उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस व तहसीलदार निलेश मडके यांना मिळाली. त्यांनी सकाळी ९ च्या सुमारास महसूल विभाग
पथकास कारवाई करण्याकरिता पाठवले होते. सध्या महसूल विभागाने अवैध वाळू चोरट्यांवर
कारवाईचा बडगा उगारला असून त्यामुळे रेती तस्करांचे धाबे दणााणले आहे.
नायब तहसीलदार संतोष आदमुलवार
यांच्या पथकाने सापळा रचून हिंगणी येथील पैनगंगा नदीपात्रातून रेत तस्करी सुरू
असलेल्या ठिकाणी पोहोचले. काही वेळ त्यांनी ट्रॅक्टरची वाट पाहिली असता एकापाठोपाठ
दहा ते अकरा ट्रॅक्टर नदीपात्रात रेती भरण्याकरिता पोहचले.
यावेळी पथकातील तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील यांनी धाड टाकली असता
रेती तस्करांची एकच धावपळ सुरू झाली. केलेल्या कारवाईत विवेक आंबेकर रा. हिंगणी, विलास राठोड व अन्य एक असे एकूण
तीन टॅक्टर जप्त केले. तर चार ट्रॅक्टरचालकांनी तलाठी कवाने व इंगोले यांच्याशी
हुज्जत घालून वाद उपस्थित केला. मात्र ट्रॅक्टर पळून जात असताना तलाठी कवाने
यांंनी टॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने सरळ ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरच घातला.
तेव्हा तलाठी कवाने व इंगोले
यांनी बाजूला सरकून आपला जीव वाचविला. तेव्हा महागाव पोलिसांना बोलावण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक उमेश भोसले यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून रेती चोरट्यांना ताब्यात
घेतले. त्यांच्यासह तीन ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावले.
0 comments:
Post a Comment