अमिताभ बच्चन धावला नानावटी हॉस्पिटलच्या मदतीला.
Amitabh Bachchan rushed to the aid of Nanavati Hospital.
◆ नानावटी_हॉस्पिटलमध्ये कोरोनावर काही रुग्णावर उपचार केले गेले असतांना 10 पैकी 7 रुग्णांनी हॉस्पिटलने प्रचंड बिलाची आकारणी
केली होती म्हणून तक्रार केली असता हॉस्पिटलची प्रतिमा (Image) खराब झाली होती व सर्वदूर हॉस्पिटल व त्यांच्या
डॉक्टरवर मीडिया, वृत्तपत्र व
जनमानसात एकूणच रोषाचे वातावरण झाले होते, हे वाचकांना चांगले माहिती असेल।
◆ अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही सध्या नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे ऍडमिट असून
उपचार घेत आहेत। खरे तर त्यांना कोरोनाची फारसी लक्षणे नसून (Asymptomatic)
ते एकदम फाईन (Fine) आहेत।
◆ त्यांच्याकडे
जुहू येथे तीन बंगले असून एकूण 18 रूम्स आहेत आणि
त्या रूम्स मिनी आय सी यु (ICU) असून त्यांचे 24 तास काळजी घेणारे फर्स्ट क्लास 2 पगारी-डॉक्टर्स आहेत। असे असतांना दोघेही
पिता-पुत्रांनी होम क्वारांटाइन (Home Quarantine) होऊन कोरोनाची खास लक्षणे नसतांना आपल्या बंगल्यावरच इलाज
करायला काही हरकत नव्हती।
◆ पण ते दोघेही
नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती (ऍडमिट) झालेत एव्हढेच नाही तर बिग बी (अमिताभ)
ट्विट्स (tweets) करून आपल्या खास
शब्दात हॉस्पिटलची तारीफ करून आभार सुद्धा मानीत आहे।
◆ आता मेख अशी की,
ज्या रेडिअंट ग्रुप (Radiant Group) च्या मालकीचे नानावटी हॉस्पिटल आहे त्यात स्वतः
अमिताभ बच्चन भागीदार असून सन्माननीय बोर्ड मेम्बर सुद्धा आहे। (मालकानेच मालकाचे
आभार मानणे !)
◆ यावरून आपल्या
लक्षात आले असेलच की, पहिल्या
पॅरिग्राफमध्ये जो मुद्धा आहे त्यावर सुंदर स्क्रिप्ट लिहून आपल्या बेहतरीन
अदाकारीने अमिताभने आपल्या हॉस्पिटलची खराब झालेली प्रतिमा सावरण्याचा एक हिट शो
केला असे म्हणावयास हरकत नाही।
0 comments:
Post a Comment