पोलीस ठाण्याच्या आत शिरून दुचाकी चोरण्याची हिम्मत कुणाची होत असेल तर, शहरात गुन्हेगारांचे राज्य आहे की कायद्याचे असा सवाल उपस्थित होत आहे.
नागपूर : २७ ऑगस्ट - उपराजधानीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख करीत असतानाच आता शहरातील पोलीस ठाणेच असुरक्षित असल्याचा प्रकार समोर आला आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्यातून एका अभ्यागतांच्या दुचाकीची चोरी झाली असून याप्रकरणी पोलीस गुन्हाही दाखल करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रवीण तरडे याने आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्याच्याविरुद्ध समाजातील विविध प्रवर्गातून निषेध नोंदविण्यात येत आहे. उपराजधानीतील बळीराजा पार्टीनेही त्याच्या विधानाविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची तमागणी केली. पार्टीचे कार्यकर्ते आशिष गजघाटे व इतर रविवारी दुपारी सीताबर्डी ठाण्यात निवेदन देण्यासाठी गेले होते.
त्यांना पोलीस ठाण्याच्या सुरक्षा भिंतीच्या आत आपली एमएच ३१,ईसी ३६०७ क्रमांकाची दुचाकी उभी केली. पाऊस सुरु असल्याने घाईगळबळीत ते दुचाकीला छबी विसरले.
प्रवीण तरडे याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर कार्यकर्ते पाच ते दहा मिनिटात पोलीस ठाण्यातुन बाहेर पडले. आशिष यांनी आपली दुचाकी शोधली असता ती दिसली नाही. त्यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याचा परिसर शोधून काढला पण, दुचाकी कुठेही सापडली नाही. त्याने दुचाकी चोरीची तक्रार दिली. पण रविवारपासून सोमवार सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.
पोलिसांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता पोलीस ठाण्याच्या आतून एकजण दुचाकी चोरून नेताना दिसत आहे. पोलीस ठाण्याच्या आत शिरून दुचाकी चोरण्याची हिम्मत कुणाची होत असेल तर, शहरात गुन्हेगारांचे राज्य आहे की कायद्याचे असा सवाल उपस्थित होत आहे.
बळीराजा पार्टीचे महासचिव नरेंद्र पालांदूरकर यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले असून पोलीस ठाण्याच्या आतमध्ये गुंड व चोरांचा धुडगूस सुरु असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यात लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे.
0 comments:
Post a Comment